जाणून घ्या! केशर खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

केशर हे जगातील एक दुर्मिळ मसाल्याच्या पदार्थां पैकी एक आहे. खाद्यपदार्थांना रुचकर करण्यासाठी अगदी पुरातन काळापासून केशराचा वापर केला जातो. केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे आणि त्याला खूप महत्व देखील आहे. केशरचा उपयोग शतकानुशतके खाण्याची चव वाढवण्यासाठी केला जातो. तसेच केशर दुधालाही खूप महत्त्व आहे. मात्र, हे केशर अत्यंत महाग असून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केशर हे केशराच्या फुलापासून तयार केलं जातं केशराचे फुल अतिशय नाजूक आणि मनमोहक दिसतं. आजकाल केशर बाजारामध्ये तीन ते साडे तीन लाख प्रति किलोने विकलं जातं. त्यामुळे केशरचा वापर करणं सर्वसामान्यांसाठी तसं थोडं महागाचं असू शकतं. मात्र केशर आरोग्यासाठी फारच उत्तम आहे.

केशर खाण्याचे आरोग्यदायी फायदे –

1. केशर पोटाशीनिगडीत अनेक समस्यावर गुणकारी आहे. उदाहरणार्थ अपचन, पोटात गॅस होणं यावर खूपच गुणकारी आहे. रोज दूधासोबत केशराचं सेवन केल्यास तुम्हाला आराम मिळेल.

2. केशर गर्भावस्थेत येणारा ताणतनाव दूर करण्यासोबत आणि मुड स्विंग्सचा त्रासही संपवते. तसेच कोणत्याही दुखण्यावर केशर हे एक रामबाण उपाय म्हणून मानले जाते.

3. डोकेदुखीपासून आराम हवा असल्यास केशर उपयुक्त ठरते. चंदन आणि केशराचा लेप करून तो कपाळावर लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. त्याचबरोबर नाकातून रक्त वाहत असल्यास चंदन आणि केशराचा लेप नाकावर लावल्याने रक्त येणे ताबडतोब बंद होते.

4. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी: केशरामुळे रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. परिणामी हृदयविकारांना आळा बसतो. तसंच उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

5. केशरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, कॉपर, झिंक, मॅग्नेशिअम असते. अनेक पोषक तत्वांमुळे अगदी लहान बाळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच केशर उपयुक्त असते.

6. केशर हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. केशर खाल्ल्याने आपली त्वचा चमकदार, सुंदर आणि तजेलदार बनते. त्वचेच्या स्वास्थासाठी प्राचिन काळापासून सौदर्य उत्पादनांमध्ये केशराचा वापर करण्यात येतो.

7. केशरयुक्त दूध हे शारीरिक उर्जा वाढवण्याचंही कार्य करतं. पुरूषांनी केशरासोबतच बदाम आणि मध यांचं सेवन केल्यासही भरपूर फायदा होतो.

8. ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो त्यांनी दररोज केशर खाल्ले पाहिजे. दररोज केशर खाल्यानं दम्याचा त्रास कमी होईल.

महत्वाच्या बातम्या –

गुन्हेगाराकडून पोलिसाला बेदम मारहाण, कारण ऐकूण तुम्हालाही…

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री…

मास्क का घातला नाही? विचारताच महिलेनं केली पालिका…

जाणून घ्या! पुढील चार दिवसात हवामान खात्याकडून…

रितेशच्या ‘त्या’ व्हिडीओ वरून जेनेलियाने केली…