जाणून घ्या! कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास पहिला डोस पुन्हा घ्यायचा का?

काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

कोरोना महाआजाराशी सामना करण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. परंतू देशातील लोकसंख्या जास्त असलेल्यामुळे लसीचा तुटवडा भासत आहे. अनेक लोकांनी कोरोनाप्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतला आहे.

मात्र लसीच्या कमतरतेमुळे काहींना लसीचा  दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे त्या लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येत आहेत. ठरलेल्या दिवसांच्या आत लसीचा दुसरा डोस घेतला नाहीतर पहिल्या डोसचा परिणाम होणार नाही. त्यामुळे दुसरा डोसचाही परिणाम होणार नाही, अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत.

तसेच लस घेतलेल्या काही लोकांमध्ये त्या लसीचे साईडइफेक्ट्स जाणवतात. या रूग्णांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. त्या समितीचे एक सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी याबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला लसीकरणाचा दुसरा डोस घ्यायला उशीर झाल्यावर त्याचा परिणाम आपल्या शरिरावर होतो की नाही, याविषयी माहिती दिली आहे.

लशीचा पहिला डोस घेतलेल्या अनेक व्यक्तींचा दुसरा डोस लांबणीवर पडला आहे, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लशींच्या दोन डोसमध्ये 4 ते 6 आठवड्यांचं अंतर असणं अपेक्षित असतं.

मात्र ते 8 ते 10 आठवड्यांपर्यंत लांबलं, तरी काहीही फरक पडत नाही. एवढ्या अंतराने दुसरा डोस घेतला, तरी तो प्रभावीच ठरतो. दोन डोसमधलं अंतर वाढलं तरी पुन्हा पहिला डोस घेणं गरजेचं नसल्याचं, डॉ. एन.के अरोरा यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘बाटलीत मूत आणि तेच सॅनिटाईझर म्हणून वापर’;…

आता माणसांनंतर चक्क माकडंही करू लागली वेगवेगळ्या…

अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात घसरण;…

‘कोरोना रुग्णाला दारु दिल्यास तो बरा होतो’…

अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच आजीनं उघडले डोळे…