जाणून घ्या! किवी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

मुंबई |  सध्या धका-धकीच्या जीवनशैलीत आपल्याला स्वत:ला आपण वेळ देत नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. वाढते प्रदुषणामुळे आपली त्वचाही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. त्याच बोरोबर आपलं आरोग्यही बिघडत चालल आहे.

प्रत्येकाला कोणतानाकोणता आजार असतो. काही लोकांना पोटाचा असतो तर काहींना त्वचेचा. प्रत्येकाला आपली त्वचा तजेलदार, टवटवीत हवी असते. विशेषत: चेहऱ्यावर अनेकांना पुरळ येणे, सुरकुत्या येणे, इत्यादी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या सगळ्या समस्यांंवर आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.

आपण आपल्या आहारमध्ये अनेक वेगवेगळ्या फळांचे सेवन करत असतो. मात्र आपल्या त्या फळाच्या गुणधर्म माहीत नसतात. त्या फळामधून आपल्याला कोणते घटक मिळतात?, ते फळ आपल्या शरिरासाठी उपयुक्त आहे की नाही, या सर्वांची उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. आज आपण किवी या फळाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. किवी हे एक कमी कॅलरीज असणारं पौष्टिक फळ आहे.

किवी खाण्याचे फायदे-

  1.  किवी या फळाचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  2. किवी फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यातील अॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील शरिरास घातक असलेल्या बॅक्टेरियांचा नाश करतात.
  3. आपल्या शरिररातील कमकुवत पेशींना सुदृढ बनविण्याचे काम किवी करते.
  4. किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅन्टिऑक्सिडंट अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तव्चा मुलायम होण्यासही मदत होते.
  5. लघवीच्या ठिकाणी जळजळ किंवा खाज येत असल्यास किवीचे सेवन केल्याने आराम मिळतो.
  6. मधुमेह रुग्णांसाठी किवी हे फळ अत्यंत उपायकारण आहे.
  7. ज्या लोकांना सांधीवाताचा त्रास असेल, त्यांनी किवी खाल्याने सांधीवाताच्या समस्या दूर होतात.

महत्वाच्या बातम्या-

नीतू कपूरचा रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ…

सफाई कर्मचारी ते सुुपरस्टार; वाचा ‘या’…

“देवेंद्र फडणवीस म्हणजे काय केंद्रीय तपास यंत्रणा आहे…

‘दबंग’ खानच्या कुटुंबातील ‘ही’…

“देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींपेक्षा मोठे नेते झाले…