जाणून घ्या! पुढील चार दिवसात हवामान खात्याकडून ‘या’ भागात पावसाचा इशारा

मुंबई |  गेल्यावर्षाभरापासून एकीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे बदलत्या हवामानाने नको-नकोस केलं आहे. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे त्याचबरोबर अनेक पीकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

आताकुठे कडाडीचा उन्हाळा जाणवायला लागला असताना, अशातच पुन्हा पाऊसाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. राज्यात पुढील काही दिवसामध्ये हवामान खात्याकडून काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील चार दिवसात महाराष्ट्र राज्यासह देशाच्या काही भागात वातावरणात मोठा बदल होणार आहे. त्यामुळे मध्य भारतातील वातावरण बदलाचा महाराहस्त्राच्या आतील भागावर जास्त प्रमाणावर परिणाम होणार होईल. मध्य प्रदेश विदर्भ आणि छत्तिसगढमध्ये पुढील चार दिवस पाऊस आणि गारपीट होणार असल्याचे, ज्येष्ठ हवामानतज्ञ कृष्णानंद होशाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर कृष्णानंद होशाळीकर यांनी टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुंबई आणि कोकोण परिसरात पावसाची शक्यता नसल्याचंही सांगितलं आहे.

हवामान खात्याकडून विदर्भ मराठवाडा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये दिवसा ढगाळ वातावरण असल्यामुळे आद्रतेचे प्रमाण वाढले असल्यामुळे उन्हाचा पार घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे. तसेच मागिल तीन-चार दिवसांत पासून मध्य प्रदेशातील विशेषत: पूर्व मध्य प्रदेशात अवकाळी पावसाला अनुकूल स्वरुपाचे वातावरण झालं असल्याचं पाहायला मिळत आहे.

चंद्रपूर शहरात पावसाच्या हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे काही काळसाठी वाहतूक कोंडी झाली होती. इतकच नाहीतर पुढील तासभरात शहर जिल्ह्यात आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर पाहायला मिळाला. काही गावांत झालेल्या गारपीटामुळे गहू, कांदा, संत्री, हरभरा या पिकांचं चांगलंच नुकसान झालं आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले पाहायला मिळत आहे.

अमरावती जिल्ह्यासोबतच वाशिम शहरातही अचानक पाऊसाने थैमान घातलं. झालेल्या गारपीमध्ये झाडांवर असलेले अनेक पक्षी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पक्षीमित्रांकडून उपचार केले जात आहेत. त्यात पोपटही मृत्यूमुखी पडल्याने पक्षीमित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

रितेशच्या ‘त्या’ व्हिडीओ वरून जेनेलियाने केली…

आलियानं लग्नच करू नये अशी महेश भट यांची इच्छा; जाणून घ्या…

मलायका अरोराने सोशल मीडियावर केला ‘हा’ व्हिडीओ…

जाणून घ्या! पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना, यात पैसे गुंतवून…

गृहमंत्री पदाचा राजीनामा देणार का?, अनिल देशमुख…