मुंबई | महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचं सावट वाढत चाललं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुगणसंख्येनं सगळीकडे चिंतेचे वातावरण तयार झालं आहे.
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही महिन्यांपुर्वी पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. आताही निर्बंधांमध्ये सक्ती केली आहे.
राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून आज दिवसभरात राज्यात 9 हजार 170 नवीन करोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. मुंबईत 6 हजार 347 नव्या करोनाबाधितांची आज नोंद झाली आहे.
राज्यात आज सात करोनाबाधित रूग्णांचा तर मुंबईत एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे.
कोरोना महामहामारीनं दिवसभरात 1445 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.35 टक्के इतकं आहे.
राज्यात आज दिवसभरात 6 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण येथील 3, पिंपरी चिंचवड येथील 2 तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा आकडा 460 वर पोहोचला आहे. त्यामुळे दिवसागणिक चिंता वाढत चालली आहे.
देशात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नांची शिकस्त करत आहे. मात्र अनलॉकिंग केल्यापासून कोरोनाचे नवे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान सोडण्याची सूचना
मित्रच ठरले यमदूत!, नांदेडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना
“लॉकडाऊनचे चटके लोकांनी भोगलेत, मात्र…”; मोठा निर्णय होण्याची शक्यता
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट
WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…