जाणून घ्या! उन्हाळ्यात दही भात खाण्याचे ‘हे’ फायदे

मुंबई |   हिवाळा ऋतू संपला असून आता उन्हाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढू लागल्याचं जाणवू लागलं आहे. उन्हाळा म्हटलं की बऱ्याच जणांची तोंडं लगेचं वाकडी होतात. कारण उन्हाळ्यात जास्त बाहेर पडता येत नाही. त्याचबरोबर बाहेर फिरायला गेलं की लगेचच त्वचा काळवंडने, टॅनिंग होणे ह्या समस्या सुरु होतात.

त्याचप्रमाणे उन्हाळ्यात अनेकांना थंडगार काही तरी खाण्याची फार सवय असते. परंतू नेहमी वेगवेगळं तरी काय खायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. परंतू आम्ही तुमच्यासाठी असाच थंडगार पदार्थ आणि त्याचे फायदे सांगणार आहोत.

अनेकांना दही आणि भात एकत्र करुन खाण्याची फार आवड असते. हा दही भात खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. दही भात खाल्याने मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतो. त्याचबरोबर आनंदी राहण्यासाठीही मदत होते.

दही भाताच्या सेवनाने होणारे फायदे-

  1. दही भात खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  2. ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा ताप आला की त्यावेळी आपल्या काहीना-काही खाण्याची सवय होते. त्या स्थितीत दही भात खाल्याने शरिराला भरपूर ऊर्जा मिळते.
  3. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
  4.  दही भाताच्या सेवनाने आपला मूड देखील चांगला होतो.
  5. दररोज दही भात खाल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर ह्रदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे.
  6. केसांवर आणि त्वचेवर दही लावल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे खूप फायदेशीर ठरते.
  7. जर कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात गुड बॅक्टेरिया असतात.
  8. पोटदुखी झाल्यावर दही भात खाल्याने पोट शांत होते आणि ते पचण्यास देखील चांगले असते.

महत्वाच्या बातम्या-

विरुष्कासह वामिकाचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल…

सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिर खानच्या मुलीनं दिली…

‘राष्ट्रपती लागवट लागू करा’ असं म्हणाऱ्यांवर…

‘या’ कारणामुळे जोडप्यानं आपल्या शेजाऱ्यांना…

‘काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून…