जाणून घ्या! गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल

नवी दिल्ली| गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर अनेक गोष्टी सर्च केल्या जातात. वेगवेगळ्या गोष्टींची माहिती, लेटेस्ट अपडेट, या सगळ्यांची माहिती अगदी एका क्लिकवर तुम्हाला मिळत असते.

गुगलवर मनोरंजन, राजकारण, क्रिडा, लाइफस्टाईल, फोटो, अर्थकारण, बातम्या, अशा अनेक गोष्टींविषयी माहिती मिळत असते. एका क्लिकवर तुम्हाला हवी असलेली माहिती मिळत असते. अशातच गुगल कंपनी वापरकर्त्यांसाठी बर्‍याच मोठ्या घोषणा करण्याची तयारी करीत आहे.

गुगल कंपनी सध्या यूझर्सच्या सुरक्षेवरुन अधिक सतर्क झाली आहे. यासाठी गुगलने प्ले स्टोअरमध्ये अनेक बदल करण्याची घोषणा केली आहे. अशातच आता 5 मे पासून प्ले स्टोअरमध्ये मोठा बदल होणार आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप इंस्टाॅल केल्यानंतर त्या अॅपला आपल्या अँड्राॅइड डिवाईसमधील अनेक परवानगी द्यावा लागतात.

गुगलने आपली डेव्हलपर प्रोग्राम पॉलिसी अपडेट केली असून या अपडेट अंतर्गत, फोनमधील उपलब्ध अॅपला दुसर्‍या अ‍ॅपला एक्सेस करण्याची परवानगी दिली जात नाही. सद्यस्थितीबद्दल बोलायचे तर अँड्रॉईड 11 मध्ये, फोनमध्ये उपस्थित असलेल्या सर्व अ‍ॅप्सची प्रत्येक प्रकारच्या परवानगीची मागणी केली जाते. तथापि, आता कंपनीला हे धोरण बदलावे लागले.

गुगल प्ले स्टोअरवर असे काही अॅप्स उपलब्ध आहेत की जर ते वापरकर्त्याद्वारे इंस्टॉल केले गेले तर ते फोनमधील उर्वरित अ‍ॅप्स एक्सेस करण्याची परवानगी मागतात. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांची महत्त्वपूर्ण माहिती लीक होण्याची शक्यता आहे.

यामध्ये बँकिंग, राजकीय संलग्नता आणि संकेतशब्द व्यवस्थापन यासारख्या विविध माहितींचा समावेश आहे. मात्र आता सुरक्षेच्या कारणास्तव, कोणत्याही वापरकर्त्याच्या कोणत्याही बँकिंग अ‍ॅपची माहिती घेतली जाणार नाही. यासाठी कंपनी काही अ‍ॅप्स बंद देखील करेल.

अॅप डाऊनलोड केल्यानंतर मागण्यात येणाऱ्या परवानग्या का गरजेच्या आहेत, या बाबतची ठोस आणि तर्कसंगत माहिती आता या अॅपच्या कंपन्यांना द्यावी लागणार आहे. युजर्सची हेरगिरी करणारे सर्व अॅप्स 5 मे 2021 पासून बंद करण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

फँड्रीतील शालूच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा…

रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला करिनाच्या दुसऱ्या मुलाचा…

सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, जाणून घ्या काय…

तहानलेल्या आधुनिक काळातील कावळ्याने पाणी पिण्यासाठी लढवली…

काय सांगता! वजन वाढल्याने मांजरालाही आलं टेन्शन, पाहा…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy