जाणून घ्या! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज काय बदल झाले?

मुंबई| अलिकडे काही वर्षांमध्ये इंधनांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनांच्या वाढत्या भावांमुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.

इंधनांचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावेत, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. याबाबत देशभरातील लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. अशातच आता सर्वसामान्यांना थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या बाजारात तेजी आहे. तेलाची मागणी वाढली आहे. तर ओपेक देशांनी उत्पादनात वाढ करण्याची शक्यता आहे. आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी, गेल्या 10 दिवसांत तेल कंपन्यांनी किंमती 3 वेळा कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

आज किंमती स्थिर राहिल्यानंतरही राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.56 रुपये आहे. तर आज इथे डिझेलची किंमत प्रति लिटर 80.87 रुपये आहे. त्याचप्रमाणे आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोलची किंमत 96.98 रुपये तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.96 रुपये आहे. इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती घेण्यात आली आहे.

वेगवेगळ्या राज्यात आकारण्यात येणाऱ्या करांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तफावत आहे. याशिवाय इंधनाच्या वाहतुकीच्या शुल्कामध्येही फरक आहे.

कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे किंमती खाली येतील, ज्याचा थेट परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या बाबतीत भारत मुख्यतः इतर देशांच्या आयातीवर अवलंबून आहे. भारत आपल्या गरजेच्या 80% पेक्षा जास्त तेलाची आयात करतो.

दरम्यान, केंद्र सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवून पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश केला तर पेट्रोल 75 रुपये लीटर आणि डिझेल थेट 68 रुपये लीटर इतके कमी दरात उपलब्ध होईल, असा दावा ‘एसबीआय’च्या आर्थिक अहवालात करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या – 

शिवपार्वतीच्या आशिर्वादाने ‘या’ राशीच्या लोकांचा…

नैसर्गिक पद्धतीनं त्वचा निरोगी राहण्यासाठी करा संत्र्याच्या…

400 दिवस रुग्णांची सेवा करुनही कोरोना ‘या’ डॉक्टरला काहीच करु शकला नाही कारण…

लग्नापूर्वी केलेल्या ‘त्या’ मोठ्या विधानावरून अनुष्काचा ‘यु टर्न’; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचं हे सुपर हॉट कपल लवकरंच विवाह बंधनात अडकणार?