जाणून घ्या ! कोरोना लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय खावे, काय खावू नये?

गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

कोरोना महाआजाराशी सामना करण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. परंतू अनेकांना हे माहीत नसते की, कोरोना लस घेण्याआधी आणि घेण्यानंतर कोणते पदार्थ खायचे असतात. तर आज आम्ही तुम्हाला याच विषयी माहीती देणार आहोत.

करोना लस घेण्याआधी जास्तित जास्त पाणी प्यायले पाहिजे. त्यासाठी आपण पाणेदार फळांचाही आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो. जसं की, कलिंगड, संत्री, काकडी इत्यादी.

तसेच, कोरोना लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी होऊ शकते. परंतू अशावेळी अल्कोहोलचे सेवन करू नये. नाहीतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी हे आजार अधिक प्रणात होऊ शकतात.

कोरोनाच्या काळात सकस आहार घेणे खूप फायदेशीर आहे. निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. त्याचप्रमाणे पालेभाज्यांच्या सेवनाने शरिराला पोषण तत्वांचा पुरवठा होतो.

दरम्यान, देशात दिवसेंदवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सरकारने नागिकांसाठी निर्बंध घालून दिले आहेत. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. या माहाभयंकर आजाराचा सामना करायचा असल्यास आपण सर्वांनी एकत्रीतपणे समोर गेलं पाहिजे. सर्वांनी सोशल डिस्टंसिंग, नियमित मास्क घालणे या नियमांचे कटाक्षाने पालन केले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-

मेडीकल कॉलेजमधील प्रचंड गाजलेला ‘तो’ व्हिडीओ…

‘बिग बॉस’च्या ‘या’ अभिनेत्रीवर…

आनंद पोटात माझ्या मावेना! कोरोनाचा दुसरा डोस मिळाल्यानं…

प्रेरणादायी! तरूणाने केलं असं काही की, पाहा व्हिडीओ

सुशांतपूर्वी रिया… ‘या’ प्रसिद्ध…