जाणून घ्या! कोरोना वॅक्सिन घेणे का गरजेचं आहे?

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

कोरोना महाआजाराशी सामना करण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. परंतू लस घेतल्यानंतर काहींना त्रास होतो. त्याचप्रमाणे त्या लसीचे आपल्या शरिरावर काही दुष्परिणामही होतात. या भितीमुळे काही लोक कोरोनाप्रतिबंधक लस घेत नाहीयत.

तर आज आम्ही तुम्हाला याविषयी माहीती देणार आहोत. सध्याच्या भयंकर परिस्थितीमध्ये कोरोना लस घेणे का गरजेचं आहे. याबद्दल काही महत्वाची माहिती सांगणार आहोत.

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही, असं नाही. मात्र लस घेतल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता कमी असते. लस घेतल्यानंतर आपल्या शरिरात अँटीबॉडीज निर्माण होतात. त्यानंतर आपल्या शरिरातील रोगप्रतिकार शक्तीही वाढू लागते.

जर आपल्या शरिरात बाहेरील एखादा विषाणू आत गेला, तर शरिरातील अँटीबॉडीज अधिक सक्रिय होऊन त्या विषाणूला मारून टाकतात. त्यामुळे आपल्या अँटीबॉडीज संसर्गाविरोध लढण्यास सज्ज झालेल्या असतात.

तसेच कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झालेला रूग्ण जास्त सिरीयस होत नाही. तो लगेच बरा होतो. त्याचबरोबर त्या रूग्णाला रेमडिसिवीर हे औषध घेण्याचीही गरज भासत नाही.

महत्वाच्या बातम्या- 

विहिरीमध्ये तो सापासोबत पोहत होता अन्…, हलक्या…

साखरपुडा झाल्यानंतर ‘हे’ कारण सांगून नवरदेवाचा…

IPl 2021: शतकाच्या जवळ असताना पडिक्कल म्हणाला, ‘मॅच…

काय सांगता! ट्रेनऐवजी रेल्वे ट्रॅकवर आला चक्क हात्ती…

हरिण तावडीत सापडलं पण बिबट्यानेच ठोकली धूम, पाहा व्हिडीओ

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy