मुंबई | प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी सकाळी मुंबईत निधन झालं. ‘क्वीन ऑफ मेलोडी’ आणि ‘स्वर नाइटिंगेल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सलग सहा दशकं लता मंगेशकर यांनी आपल्या जादुई स्वरांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यांची कमाई, त्यांची आवड ही असमान्य होती.
शेकडो गाणी, वेगवेगळ्या भाषांमध्ये गाण्याचे प्रयोग, सर्वोच्च भारतीय सन्मान यासोबत लता मंगेशकर यांनी जगभरात आपल्या गाण्यांचे कॉन्सर्टही केले. आपल्या गाण्यांमधून त्यांनी जितके चाहते जमवले, तितकीच घसघशीत कमाईदेखील (Property of Lata Mangeshkar) केली
लता मंगेशकर यांची नेटवर्थ तब्बल 50 मिलियन युएसडी इतही असल्याची माहिती रिपब्लिकवर्ड.कॉम या वेबसाईटवर 28 सप्टेंबर 2020 रोजी देण्यात आलेल्या एका बातमीत सापडते.
50 मिलियन युएसडी म्हणजेत भारतीय चलनात तब्बल 3,68,01,500 इतकी रक्कम होते. म्हणजेत तब्बल 368 कोटी. आताच्या घडीला या रक्कमेत आणखी वाढ झाली असेल, असंही काही जाणकार सांगतात.
लता मंगेशकर प्रभाकुंज या मुंबईतील एका प्रतिष्ठीत इमारतीत राहतात. ही इमारत दक्षिण मुंबईतील पेडर रोड इथं आहे. लता मंगेशकर या गाड्यांच्याही शौकिन होत्या. त्यांच्याकडे शेवर्लेट, ब्विक आणि क्रिसलर या एकाएक भारी ब्रॅन्डच्या महागड्या गाड्या आहेत.
विशेष म्हणजे लता मंगेशकर यांना तर दिग्दर्शक यश चोप्रा यांनी गिफ्ट म्हणून महागडी मर्सिडीज दिली होती. वीर झारा या सिनेमासाठी त्यांनी गायलेल्या गाण्यामुळे खूश होऊन यश चोप्रा यांनी लता मंगेशकर यांना महागडी मर्सिडीज गिफ्ट दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार
कुणी कुणाचं सांत्वन करायचं?, मातृतुल्य आशीर्वाद हरपला- उद्धव ठाकरे
…म्हणून लता मंगेशकर यांनी लग्न केलं नाही, ‘हे’ होतं कारण
लता दीदी आम्हाला सोडून गेल्या, मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे- नरेंद्र मोदी