…म्हणून भाजपच्या ‘या’ महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल

परभणी | जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी व जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जिंतूर-सेलू मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवा मोंढा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकऱ्यांकडून संचारबंदी व जमावबंदीचे आदेश असतानाही त्यांनी कार्यालयाचं गेट अडवलं होतं.

आंदोलन करताना पायऱ्यांवर फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवता बसून पोर्चमध्ये कापूस टाकला, तसेच घोषणाबाजी करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचं यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, रामराव वडकुते, भाजपचे शहराध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, बालाप्रसाद मुंदडा, रमेश दुधाटे, बाळासाहेब जाधव, सुरेश भूमरे व इतर तिघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आली.

महत्वाच्या बातम्या-

-…अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार; राज्य सरकारचा नवा आदेश

-योगी आदित्यनाथांच्या वाढदिवसाला संजय राऊतांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा

-अशाप्रकारे ‘या’ शिक्षिकेनं 13 महिन्यात कमावले 1 कोटी रुपये वेतन

-अडचणीच्या काळात काँग्रेसला आणखी एक धक्का; ‘या’ आमदारानं सोडली साथ

-गर्भवती हत्तीण मृत्यू प्रकरणात प्रशासनाच्या जोरदार हालचाली; केली ‘ही’ धडक कारवाई!