तिरुअनंतपुरम | केरळमधील मलप्पुरमध्ये गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात होती. तसेच या घटनेचे पडसाद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर उमटले.
एका भुकेल्या गर्भवती हत्तीणीचा फटक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. आता या गर्भवती हत्तीणीचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे.
तोंडात स्फोट झाल्यामुळे हत्तीणीच्या तोंडात जखमा झाल्या होत्या. हत्तीण गेल्या अनेक दिवसांपासून उपाशी असून 10 ते 12 दिवसांपासून तिला वेदनाही होत होत्या. त्यामुळे ती काहीही खात नव्हती की, पाणीही पित नव्हती. त्यामुळे काही दिवसांनी ती अशक्त झाली आणि पाण्यात पडल्याची माहिती आहे.
गर्भवती हत्तीणीचा पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार बुडण्यामुळे हत्तीणीच्या शरीरात भरपूर पाणी साचलं होतं, ज्यामुळे फुफ्फुसांनी काम करणं थांबवल्याने हत्तीणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच”
-रायगड जिल्ह्याला 100 कोटी रुपये मदत तोकडी ठरेल- देवेंद्र फडणवीस
-‘मी तुम्हाला शेवटची ताकीद देतोय’; अरविंद केजरीवाल संतापले
-रायगड संवर्धनाचं काम का रखडलं हे माझ्यापेक्षा संभाजीराजेंना विचारलेलं बरं- अमोल कोल्हे
-पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्या; राजेंद्र विखे पाटलांची राज्यपालांकडे मागणी