First Brain Chip in Human l बापरे! मानवाच्या मेंदूमध्ये बसवली चिप, मेंदूवर ठेवणार नियंत्रण

First Brain Chip in Human l एलॉन मस्क यांनी एक नवा इतिहास रचला आहे. जगात पहिल्यांदाच एक व्यक्तीच्या मेंदुमध्ये चीप बसवण्यात आली आहे आणि चिप बसवण्यात ते यशस्वी झाले आहेत. या चिपद्वारे शरीरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. न्यूरोलिंक कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी यासंदर्भातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे.

चिप बसवल्यानंतर मानव अनेक गोष्टी सहजरित्या करू शकतील! :

माणसांच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर मानव अनेक गोष्टी सहजरित्या करू शकतील जे की ते सामान्यपणे करू शकत नाहीत. याशिवाय अवयवांवर नियंत्रण गमावलेल्या लोकांना चिप इम्प्लांटचा फायदा होऊ शकतो असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. (First Brain Chip in Human)

न्यूरॉन्स हे अशा प्रकारचे सेल्स असतात जे इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नलचा वापर करुन मेंदू आणि शरीरात माहिती पोहचवण्याचे कार्य करत असतात. याबाबत अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून न्यूरोलिंक कंपनीला एका पॅरालिसिस झालेल्या रग्णावर चाचणी घेण्याची त्यांना परवानगी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ही चाचणी केली व चाचणी यशस्वीरीत्या (First Brain Chip in Human) पूर्ण झाली. तसेच पॅरालिसिस झालेले शरीर किंवा निकामी झालेल्या रुग्णांसाठी हे एक वरदान ठरणार आहे.

First Brain Chip in Human l मेंदू आणि संगणकाच्यामध्ये थेट कम्युनिकेशन चॅनल तयार करणे हे उद्दिष्टे :

मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की , ज्या रुग्णाच्या मेंदूमध्ये चिप बसवण्यात आली आहे, त्यांची तब्येत सुधारत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षीच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कंपनीला त्याच्या चिपची मानवांमध्ये चाचणी करण्याची परवानगी दिली होती.

2016 मध्ये सह-स्थापित केलेल्या न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनीचे उद्दिष्ट मेंदू आणि संगणकाच्यामध्ये थेट (First Brain Chip in Human) कम्युनिकेशन चॅनल तयार करण्याचे आहे. असा विश्वास आहे की या तंत्रज्ञानामुळे सर्व उपकरणे फक्त विचार करून काम करण्यास सुरवात करतील.

एएलएस किंवा पार्किन्सन्स सारख्या मज्जासंस्थेसंबंधीच्या विकारांवर उपचार केल्यानंतर, मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील चांगले संबंध साधण्याची कल्पना या चिपच्या आविष्कारातून एक दिवस पूर्ण होऊ शकते. एलोन मस्कची महत्त्वाकांक्षा मानवी क्षमतांच्या सुपरचार्जिंगशी देखील संबंधित आहे. (First Brain Chip in Human)

News Title : First Brain Chip in Human

महत्वाच्या बातम्या –

Today Horoscope l या राशीच्या व्यक्तींनी पैसे खर्च करताना विचार करावा

Mercedes-Benz GLA Facelift Launched l 360 डिग्री कॅमेरा फीचर्ससह Mercedes-Benz GLA कार लाँच! पाहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Railway Jobs 2024 Recruitment l कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार ! रेल्वेत हजारो लोको पायलट्सची बंपर भरती सुरु

Valentine Day Trip l ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये फिरायचा प्लॅन करताय? तर या ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Supriya Sule l या नेत्याबद्दल सुप्रिया सुळेंच मोठं वक्तव्य; ‘ते भारताचे मजबूत नेते आहेत, पण…