जगभरात कोरोना व्हायरसने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अमेरिका, चीन व युरोपातील आर्थिक महासत्तांनी सुद्धा या विषाणूपुढे हात टेकले. भारताची अवस्थाही दिवसेंदिवस भयभित करणारी बनत चालली आहे. मात्र आफ्रिकेतील एक लहानसा देश या परिस्थितीत ‘कोरोनामुक्त देश’ म्हणून चर्चेत आला आहे.
आफ्रिकेतील टांझानिया नावाचा हा छोटासा देश. गरिबी, भूकबळी, पायाभूत सुविधांची वाणवा आणि तोकडी वैद्यकीय यंत्रणा असलेला हा देश. जगभरातील आर्थिक महासत्तांनी कोरोना व्हायरसपुढे हार मानलेली असताना टांझानियाचे नागरिक मात्र नेहमीचे जीवन जगत आहेत. नक्की असं काय घडलं, की टांझानिया सारखा अप्रगत देश महाभयंकर अशा व्हायरसला हरवू शकला?
टांझानियाचे राष्ट्रपती जाॅन मागुफुली यांनी नुकताच आपला देश कोरोनामुक्त देश असल्याचं घोषित केलं अन देशभर एकच जल्लोष करण्यात आला. आपल्या विजयाचं श्रेय जाॅन यांनी आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा तसेच प्रार्थना करत असलेल्या सर्व नागरिकांना दिलं आहे. चक्क राष्ट्रपती जाॅन यांचीही अशी ठाम श्रद्धा आहे की लोकांनी केलेल्या प्रार्थना हा कोरोनाला हरवण्याचा महत्वाचा मार्ग आहे.
जाॅन म्हणतात ‘कोरोनाला शह द्यायचा असेल तर सर्वांनी प्रार्थना करा, कारण येशूच्या शरीरात कसलाच राक्षसी व्हायरस टिकू शकत नाहीत. काही प्रश्न भगवान भरोसे सोडले जातात. पण या देशाने चक्क जगण्या-मरण्याचा प्रश्नच देवावर सोडला आहे. एवढंच नाही तर त्यांनी लोकांना चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याचा सल्लाही दिला आहे. मात्र खरंच टांझानिया हा देश कोरोनामुक्त आहे का? याबाबत शंका देखील व्यक्त केली जात आहे.
कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, 29 एप्रिल पासून आजतागायत टांझानिया या देशाने कोरोना संबंधी पेशंटचा कसलाच डेटा जाहिर केलेला नाही. या देशातील कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांची शेवटची आकडेवारी घेण्यात आलो होती. तेव्हा या देशात 509 पाॅझिटीव्ह रूग्ण तर 21 लोकांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला होता.
टांझानिया देशात मात्र सोशल डिस्टंसिंगच उल्लंघन केलंच जात होतं. देशातील सर्व धार्मिक स्थळं खुली ठेवण्यात आली होती. खुद्द राष्ट्रपतींचाच पाठिंबा होता मग लोक तरी काय करणार?, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनाही टांझानिया सरकारवर चांगलीच नाराज होती. आता चक्क या देशानेच कोरोनामुक्त असल्याची घोषणा दिलीय.
टांझानिया देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढण्यास या देशाने चक्क ‘कोव्हिड टेस्ट किट’लाच जवाबदार धरलं आहे. टेस्ट कीटवर आरोप केल्यावर पहिल्यांदा टांझानिया हा देश चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, टांझानियातील ‘डर एस सलाम’ या शहरात आता शेवटचे चार कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण असल्याच सांगण्यात येतंय.
कोरोनाला मात देण्यासाठी जगभरातील संशोधक लस विकसित करण्याच्या कामात गुंतले आहेत. सध्या सोशल डिस्टंसिंगच पालन करणं आणि जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवून दिलेली काळजी घेणं हा एकमेव पर्याय असल्याचं दिसून येतंय. लाॅकडाऊन योग्य की अयोग्य? असा वाद राजकीय पटलावर रंगl असताना टांझानियाच्या कोरोनामुक्तीचा हा आढावा पाहून जनता अजून संभ्रमात पडेल एवढं मात्र नक्की…
महत्वाच्या बातम्या-
-चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
-तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का?- देवेंद्र फडणवीस
-गुड न्यूज! देशात पहिल्यांदा अक्टिव्ह केसेस पेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त
-कोरोनाच्या संकटात बँकांकडून मदतीचा हात; कमी व्याजात असं मिळवा पर्सनल लोन
-‘…पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं’; अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन पवारांचा कोश्यारींना टोला