मुंबई | गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या राज ठाकरेंच्या जोरदार फटकेबाजीनं राज्यातील वातावरण ढवळून काढलं आहे. याचेच पडसाद सध्या राज्यभरात दिसून येत आहेत.
ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावू. परंतु, हे स्पीकर लावण्यासाठी एकही बहुजन जाता कामा नये, अशी घोषणा काल राज ठाकरेंनी केली होती.
स्पीकर लावण्याच्या राज ठाकरेंच्या घोषणेवर आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी ठाकरेंना चांगलंच सुनावलं आहे.
घोषणा तूम्ही करणार आणि बहुजन कार्यकर्ता त्यात भरडला जाणार. पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा, असं सुजात यांनी म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडी ही भाजपचे बी टीम असल्याच्या आरोपावरही सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला.
ज्यांनी आमच्यावर बी टीमचा आरोप केला, ते सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर गेले होते, असं टीकास्त्र सुजात आंबेडकर यांनी सोडलं आहे.
राज ठाकरेंना माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या. तुम्ही स्वतःचा पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा नका करु, अशी विनंती सुजात यांनी केली आहे.
सुजात आंबेडकर पुढे म्हणाले की, आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि वंचितांची सत्ता आणायची असेल तर घरोघरी जाणं गरजेचं आहे. लाटेवर जायचं नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
Corona Update: ‘या’ ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ
“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले”
“राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मी 200 टक्के सहमत”
एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचं पुन्हा आवाहन, म्हणाले…
राज ठाकरेंना अक्कलदाढ उशीरानं आली – संजय राऊत