मुंबई | शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले आणि शिवसेनेवर आपला हक्क सांगितला. अगदी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर देखील त्यांनी दावा सांगितला.
त्याविरोधात त्यांचे आणि शिवसेनेचे वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) प्रलंबित आहेत. येत्या 22 ऑगस्टला त्या खटल्यची सुनावणी आहे. एकनाथ शिंदे यांनी आपला गट म्हणजेच खरी शिवसेना (Shivsena) असा दावा केला आहे.
आता शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी एकनाथ शिंदे गटाचे दादरला प्रति शिवसेनाभवन बांधणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यात ठीकठीकाणी शिंदे गटाची कार्यालये देखील बांधणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्टीकरण दिले. आम्ही शिवसेना भवन किंवा प्रति शिवसेनाभवन बांधत नसून जनतेच्या सेवेसाठी एक मध्यवर्ती कार्यालय उभारणार आहोत.
त्यामुळे ह्या वादावर जरी पडदा पडला असला तरी आता शिंदे गटाच्या पहिल्या शाखेची बातमी येत आहे. मानखुर्द (Mankhurd, Navi Mumbai) येथे शिंदे गटाची पहिली शाखा स्थापन करण्यात आली.
शनिवारी शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी उद्घाटन केले आहे. मानखुर्द येथून शिंदे यांच्या पहिल्या शाखेची सुरुवात झाली असून, आता राज्यात देखील ठीकठीकाणी शिंदे यांच्या शाखा उभारण्यात येणार आहेत.
शिवसेना शाखा क्रमांक 143 असे या शाखेला नाव देण्यात आले. शाखेवर लावण्यात आलेल्या फलकावर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो दिसत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो या फलकावरुन गायब दिसत आहेत. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना खरी, उद्धव ठाकरे कोणी नाहीत, असा संदेश या फलकातून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –