“मी काय करायचं ते मी ठरवणार, मला सांगू शकत नाही”

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भासले यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे. मात्र, आतापर्यंत त्यांनी यावर थेट भाष्य करणं टाळलं होतं. अखेर सोमवारी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंची मनधरणी करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंना पाठवले आहे.

मी माझ्या अटींवर प्रवेश करेन. मी काय करावं हे कुणी दुसरं सांगू शकत नाही. मला काय करायचं ते मी ठरवणार आहे. मला शोभेल असं आणि लोकहिताच्या अटी मान्य झाल्यास मी निर्णय घेईन. शेतकऱ्यांसाठी विमा योजनेची अट आहे. मी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. त्यांनी ठरवावं आणि मला सांगावं. जायचं असेल तर हो, नसेल तर नाही, असं उदनराजे भोसले म्हणाले आहेत.

उद्योग बंद पडत आहेत. त्यांना पुन्हा कसं सुरू करता येईल, यावर विचार करावा लागेल. अन्यथा भारतावर दिवाळखोरीची वेळ येईल. आपण पैसे कोठून आणणार? आपण पैशाचं नाटक करू शकत नाही, असंही उदयनराजे यांनी सांगितलं.

नोटबंदी आणि जीएसटीवर त्यांच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी आपण आजही नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर नाराजच असल्याचं म्हटलं.

नोटाबंदीनं ग्रामीण भागातील गरिबांच्या आयुष्याची कमाई उद्ध्वस्त केली. आपल्या देशातील नागरिकांची स्थिती लक्षात घ्यायला हवी. देशातील निम्म्याहून अधिक लोकांना बँकिंग क्षेत्राविषयी फारशी माहिती नाही. शहरात काहीशी वेगळी स्थिती मात्र, काही ठिकाणी घरात टीव्ही देखील नाही. त्यांना काय कळणार? त्यामुळे नोटा बंद करताना थोडा तरी विचार करायला हवा होता, असंही उदयनराजे भोसले.

महत्वाच्या बातम्या-