मुंबई | शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेनेची ओळख असलेला दसरा मेळावा यंदाच्या वर्षी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. शिवसेनेने रीतकर शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानासाठी पालिकेला अर्ज केला होता.
पण शिवसेनेत बंडखोरी करुन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या गटाने देखील शिवाजी पार्क मैदानातच दसरा मेळावा घेऊ, असा पवित्रा घेतला आणि त्यांनी पण अर्ज केला.
या अर्जांवर पालिकेने निकाल देत दोघांचे अर्ज केराच्या टोपलीत टाकले आणि शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरुन खंडीत झाला, असा सर्वांचा समज झाला.
शिवसेनेने पालिकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले. शिंदे यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने शिंदे यांचा अर्ज फेटाळत शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी दिले.
शिवसेनेकडून आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील एक लढाई जिंकल्याची भावना शिवसेनेने व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदार दादा भुसे (Dada Bhuse) यांनी यावर भाष्य केले आहे. आम्ही आता आमचा मेळावा कुठे घ्यायचा हे निश्चित करु, असे दादा भुसे म्हणाले.
आम्हाला न्यायालयाचा फटका वैगरे काही नाही. न्यायालयात दाद मागणे लोकशाहीला अभिप्रेत आहे. न्यायालयाला जे योग्य वाटले, तसा त्यांनी निर्णय दिला आहे, असे दादा भुसे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही मेळावा घेणार आहोत, त्यामुळे ते जिथे सांगतील आणि ठरवतील तेथे मोठ्या प्रमाणात आम्ही मेळावा घेणार असल्याचे देखील दादा भुसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
नवनीत राणांना लवकरच अटक होणार, न्यायालयाने बजावले अजामीनपात्र वॉरंट
फाल्गुनी पाठक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचा निकाल जाहीर
शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा वाद निकालात; शिवाजी पार्कवर कोण घेणार, ‘दसरा मेळावा’?
“… तर आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल”; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा