रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार का?, बेलारूसच्या बैठकीवर जगाचं लक्ष लागलं

नवी दिल्ली | रशिया-युक्रेनमध्ये सध्या घनघोर युद्ध सुरू आहे. मोठ्या प्रमाणात जीवितहानी होताना दिसत आहे. परिणामी या युद्धानं जर आणखीन पेट घेतला तर संपुर्ण जगाला परिणाम भोगावे लागणार आहेत.

युक्रेनच्या नाटो देशांशी वाढत चाललेल्या मैत्रीमुळं आणि नाटोच्या रशियाच्या सीमाभागातील देशांसोबत वाढलेल्या व्यवहाराचे फलित म्हणजे युक्रेन-रशिया युद्ध आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यानं सर्वांना चिंता लागली आहे.

रशिया हा जगातील प्रमुख सैन्यदल असलेला देश आहे. रशियाच्या तुलनेत कमी प्रमाणात सुरक्षा सामग्री असतानाही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष युद्धभूमीवर उतरून लढत आहेत. जगातील इतर देशांना मदतीचं आवाहन करत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम जगावर होणार असल्यानं अनेक देशांनी हे युद्ध रोखण्याचे प्रयत्न चालवले आहेत. याचाच एक भाग म्हणून रशिया-युक्रेनच्या शिष्टमंडळाची शांततेसाठी एक बैठक बेलारूसमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांचे अधिकारी आणि नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. परिणामी जगाचं लक्ष बेलारूसमध्ये होणाऱ्या या बैठकीकडं लागलं आहे. रशिया आपल्या सैन्याला युक्रेनवर कसल्याही परिस्थितीत ताबा मिळवण्याचे आदेश देत आहे.

व्लादिमीर पुतिन यांनी काही तासांपूर्वीच रशियन न्युक्लिअर विंगला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. संयुक्त राष्ट्रात सध्या या युद्धाच्या परिस्थितीवर जोरदार हालचाली चालू आहेत.

अमेरिका, ब्रिटन, इटली, नाटो, युरोपियन युनियन या सर्वांनी रशियावर वेगवेगळे निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटन सरकारनं पाच रशियन बॅंकांवर निर्बंध लादत रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, युक्रेन सैनिकांनी शस्त्रे टाकून माघार घ्यावी तर आपण युद्ध थांबवण्यास तयार असल्याचं पुतिन यांनी म्हटलं होतं. पण आम्ही आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी समर्थ असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “नवाब मलिक चांगला माणूस, त्यांना अटक व्हायला नको होती”

 रशियामुळे पाकिस्तानची गोची; जो बायडन यांच्या इशाऱ्याने इम्रान खान यांचं टेन्शन वाढलं

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार 

“अजूनही वेळ गेली नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा” </a