औरंगाबादमध्ये हृदयद्रावक घटना! तीन सख्ख्या भावांसह पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

औरंगाबाद | कोरोनाकाळात औरंगाबादमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. औरंगाबाद मधील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाथनगर येथील पाझर तलावात 5 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या 5 तरुणांमध्ये 3 सख्खे भाऊ होते.

भालगाव या गावातील 9 तरुण कोबी काढण्यासाठी नाथनगर येथे गेले होते. कामाच्या ठिकाणापासून पाझर तलाव जवळच असल्याने 9 मधील 5 तरुण त्या तलावात पोहण्यासाठी उतरले. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे

समीर मुबारक शेख (वय 17), सत्तार शेख (वय 17), तालिब युसूफ शेख (वय 21), अतिफ युसूफ शेख (वय 17), सोहेल युसूफ शेख (वय 16) अशी मृतांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचून तलावातील मृतदेहांचा शोध घेत आहेत. 5 पैकी 2 मृतदेह पाण्यातून काढण्यात आले आहेत. तरुणांवर ओढवलेल्या या अपघाती मृत्यमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया चक्रवतीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आज सेवानिवृत्त; मला सुद्धा अनेक आजार आहेत पण मी…

घरात सोनं ठेवताय? आता सरकारला द्यावी लागू शकते घरातील सोन्याची माहिती

कोरोना पॉझिटिव्ह आईने दिला दोन जुळ्या बाळांना जन्म; बाळांचे रिपोर्ट आले…

भाजपला झाली लगीनघाई पण जोडीदारीण मिळेना, उद्यापासून लॉकडाऊन तोडा- प्रकाश आंबेडकर