झेंडा फडकवणे आणि ध्वजारोहणमधील नेमका फरक काय? वाचा सविस्तर माहिती

नवी दिल्ली | भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीच्या दृष्टीनं सर्वात मोठा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस आहे. देशाला एका समान सुत्रात बांधणारा महत्त्वाचा दिवस म्हणून प्रजासत्ताक दिनाला आपण ओळखतो.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वज फडकवतात. तर 26 जानेवारीला देशाचे प्रथम नागरिक असलेले राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.

सर्वांनी या दोन्ही दिवसांतील फरक समजू घेणं गरजेचं आहे. देशाचे पंतप्रधान हे पद स्वातंत्र्यानंतर आणि घटना स्विकारल्यानंतरच दुसरं महत्त्वाचं पद आहे.

जेव्हा देश स्वातंत्र झाला तेव्हा देशात राष्ट्रपती हे पद अस्तित्वात नव्हतं. परिणामी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवसांच्या झेंडा फडकवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत.

15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला (flag unfurling) म्हणतात.

15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला, म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चाललं.

याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.

15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो. भारताच्या प्रत्येक नागरिकाला ही माहिती स्पष्टपणे माहित असणं गरजेचं आहे.

भारत 26 जानेवारीनंतर जगामध्ये एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला. भारताच्या लोकशाहीचं हे अंगभूत वैशिष्ट्ये आहे. जगात भारताच्या लोकशाहीला मान आहे.

दरम्यान, भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून देशाच्या सामर्थ्याचं दिल्लीतील राजपथावरून जगाला दर्शन घडवलं जातं. तर चित्ररथांच्या माध्यमातून भारताच्या संघराज्य पद्धतीच्या एकतेचं प्रदर्शन केलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Stealth Omicron रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, समोर आली ‘ही’ लक्षणं

 “किंग कोहलीचं युग संपलंय, आता नव्या कॅप्टनला…”, विराटच्या कोचचं मोठं वक्तव्य

“पूनम महाजन सध्या कुठं आहेत? त्यांचं भाजपशी नातं काय?”

“… कबूलीनामा संजय राऊतांनीच दिलाय, पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना?”

 महिंद्रांनी पाळला शब्द, जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो