मुंबई | तमिळ चित्रपट पुष्पाची (Pushpa) क्रेज अजूनही सोशल मीडियावर कायम असल्याचं पहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या स्टाईलपासून ते डायलॉगपर्यंत सगळ्याच गोष्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
लहान मलांपासून ते दिग्गज सिनेकलाकार आणि खेळाडूंना देखील पुष्पाच्या डायलाॅगने याड लावल्याचं पहायला मिळालं आहे. राजकीय पटलावर देखील पुष्पाच्या डायलाॅगचा फिवर उतरल्याचं दिसत नाही.
अशातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील पुष्पाच्या डायलाॅगमुळ चर्चेत आल्या आहेत. सत्ताधाऱ्याविरोधी आक्रमक भूमिका असेल किंवा इतर आंदोलने त्यामुळे नवनीत राणा चर्चेत असतात.
नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हनुवटी खालून हात फिरवत राणा यांनी पुष्पाची डायलाॅगबाजी केली आहे.
नवनीत नाम सुनके फ्लॉवर समझे क्या,फायर हूँ मैं, असं नवनीत राणा म्हणाल्या. त्यावरून आता त्यांचा हा डायलाॅग राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
दरम्यान, नवनीत राणा मागील काही वर्षापासून सक्रिय असल्याचं पहायला मिळतंय. अनेक कार्यक्रमात त्या नेहमी हजेरी लावत असतात. अशातच एक कार्यक्रम आटोपल्यावर त्यांनी हा डायलाॅग मारला आहे.
पाहा व्हि़डीओ-
महत्त्वाच्या बातम्या –
“…मग मोहन भागवत यांच्या नावापुढे ‘खान’ लावणार का?”
“देवेंद्रजी, चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”
एमआयएमच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…