मुंबई | केंद्र सरकार पाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील करकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोल 2 रुपये 8 पैसे तर डिझेल 1 रुपये 44 पैसे स्वस्त होणार आहे.
ठाकरे सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी स्वस्त झालं आहे तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त झालं आहे.
पेट्रोलचा दर 9.50 पैसे आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन सीतारमण यांनी केलं आहे.
केंद्राकडून कर कमी झाल्यानंतर राज्य सरकारने देखील यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली होती. यानंतर ठाकरे सरकारनेही महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
पेट्रोल-डिझेलचे हे नवे दर कधी लागू होतील याबाबत सध्या अधिकृत माहिती नाही. पण, लवकरच हे दर लागू होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तू कोण आहेस, गांधी की वल्लभभाई?’; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका
राज ठाकरेंच्या सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
“मी टीका सहन करेन पण माझ्या पोरांना अडकू देणार नाही”
“खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी….”
राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंचा खळबळजनक दावा, म्हणाले…