मुंबई | राज्यातील दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढं ढकलण्याची नामुष्की पुन्हा एकदा एमपीएससी आयोगावर आली आहे. परिणामी राज्यात गोंधळ निर्माण झाला आहे.
एमपीएससी आयोगामार्फत जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यात ऐन तोंडावर आलेली परीक्षा पुढं ढकलण्याची नामुष्की यावर्षी दोन वेळा आयोगावर आली आहे. याअगोदरही राज्यसेवा पुर्व परीक्षेची परीक्षा पुढं ढकलण्यात आली होती.
राज्यातील विद्यार्थ्यांनी आमच्यावर अन्याय झाला आहे, असं म्हणत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर आयोगानं हा निर्णय घेतला आहे.
एका प्रश्नाचे उत्तर बरोबर असताना आयोगाकडून चुकीची उत्तर तालिका देण्यात आली, असं म्हणत 86 विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.
86 विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर राज्यभरातील आणखी तब्बल 3500 विद्यार्थी देखील अगदी तशाच प्रकारचे असल्याचं उघडकीस आलं होतं.
राज्यभरात या 86 विद्यार्थ्यांच्या निकालावरून वाद सुरू झाला होता. न्यायालयानं आम्हालाही न्याय द्यावा यासाठी राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी आंदोलन केलं होतं.
राज्यात सुरू असलेला गोंधळ लक्षात घेता राज्य लोकसेवा आयोगानं ही परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
दरम्यान, न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत ही परीक्षा आता होणार नाही. परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा न्यायाच्या आशा जिवंत झाल्या आहेत.
पाहा ट्विट –
जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/yYxibimdle
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 27, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी
टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता
मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”
“तो फोटो कुणी काढला?, हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा”