कोरोनाच्या नियमांचं पालन करत नवरा-नवरीनं काठीच्या सहाय्यानं घातला हार, पाहा व्हिडीओ

मुंबई| संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

असा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

अशातच लग्नसमारंभ पार पाडतानाही कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणो पालण करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. अशातच नुकताच बिहारमध्ये एक लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात कोरोनाच्या नियमांचं अगदी कोटेकोरपणे पालन करण्यात आलं. एवढंच नाही तर नवरी-नवरीनं चक्क काठीच्या साहाय्याने एकमेकांना हार घातलेले दृश्य पहायला मिळालं.

कोरोनाच्या नियमांचं पालन करत, सोशल डिस्टंन्सिंग पाळत, लग्नसमारंभ पार पाडल्यानं या वधु-वरांचं सगळीकडे कौतुक होतय. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

बिहारमधील बेगूसरायमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात काठीच्या मदतीने एकमेकांमध्ये अंतर राखून हार घातल्यामुळे हा लग्नसोहळा विशेष चर्चेत आला.

30 एप्रिल रोजी हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी नवरा-नवरीने मास्क लावलं होतं. तसंच सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत, एकमेकांना हार घातले. कोरोना काळात लग्नसमारंभ करताना मास्क घालणं, 50 लोकांची उपस्थिती, सोशल डिस्टंन्सिंग अशा गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. या लग्नात या सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यात आलं होतं. सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन करत, अशा परिस्थितीत केलेल्या या लग्नामुळे अनेकांना जागरुक केलं आहे.

दरम्यान, देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्ण संख्येत तर वाढ होतचं आहे, पण दुसरीकडे रोज हजारो लोकांचे प्राण कोरोना या एक अदृश्य विषाणूमुळे जात आहेत.

एखाद्याला कोरोना झाला तर त्याचा प्रवास सुरू होतो. कधी तो प्रवास बेड पासून थेट स्मशानभूमीत थांबतो. कोरोना गरीब श्रीमंत असं काहीही पाहात नाही. आज इतकी कठीण परिस्थिती आहे, की अंतिमसंस्कारसाठी लोकांकडे पैसे तर नाहीचं पण अग्नी देण्यासाठी पण रांग लावावी लागत आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर अभिनेत्री झाली आनंदी,…

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘या’ अभिनेत्यांनं…

एक समोर, एक शेजारी मगरींनी आडवला महिलेचा रस्ता त्यानंतर जे…

कोरोना योद्धाला सलाम! कोरोनाने आई, वडिल, भावाचा मृत्यू तरीही…

चक्क लांडग्याने सिंहाची शेपटी खेचली अन्…, पाहा व्हिडीओ