Food Inflation l महागाईचा धक्का बसणार? कांद्यासह या भाज्यांचे दर सर्वसामान्यांना रडवणार

Food Inflation l सध्या सर्वत्र महागाई वाढत चालली आहे. अशातच आता वाढत्या महागाईसंदर्भात एक महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. सध्या बटाटा, कांदा, टोमॅटो या प्रमुख भाज्यांचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईचा (Onion Rate Increase) फटका बसू शकतो. अलिकडच्या आठवड्यात या प्रमुख भाज्यांचे भाव वाढले आहेत, त्याचा परिणाम अन्नधान्याच्या महागाई दरावर दिसून येत आहे. (Food Inflation)

ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या जानेवारीच्या आकडेवारीनुसार, बटाट्याचा किरकोळ दर वार्षिक आधारावर 33 टक्क्यांनी वाढला आहे आणि सध्या तो 20 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्याचबरोबर कांद्याच्या किरकोळ भावात 20 टक्क्यांनी वाढ होऊन कांदा 30 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर टोमॅटोच्या दरात देवगिल वार्षिक 50 टक्क्यांनी वाढ झाली असून तो किरकोळ बाजारात 30 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. (Onion Rate Increase)

Food Inflation l महागाई वाढण्याची शक्यता :

अशातच पुढील काही महिन्यांत टोमॅटो आणि बटाटा यांसारख्या भाज्यांच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. गतवर्षी याच काळात टोमॅटो (Prices of tomato, potato, onion will increase) आणि बटाट्याच्या भावात वाढ झाली होती.

तसेच जुलै 2023 मध्ये पावसाळ्याच्या खराब परिस्थितीमुळे टोमॅटोच्या किमती 202 टक्क्यांनी वाढल्या होत्या आणि देशाच्या अनेक भागांमध्ये ते 100 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त विकले गेले होते. यानंतर सरकारने बाजारात हस्तक्षेप करून पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी अनेक ठिकाणी टोमॅटो 70 रुपयांनी विकले गेले होते.(Food Inflation)

कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ही पावले उचलली :

किरकोळ बाजारात कांदा 30 रुपये किलो दराने विकला जात असून गेल्या तीन महिन्यांत त्याच्या किरकोळ किमतीत 25 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये कांद्याच्या किमतीत 74 टक्क्यांनी वाढ झाली होती, त्यानंतर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यासोबतच सरकारने 25 रुपये दराने कांदा विकण्याचा निर्णयही घेतला होता.

Food Inflation l सरकारच्या या प्रयत्नांमुळे नाशिक बाजारात कांद्याचा भाव (Prices of tomato, potato, onion will increase) आता 1000 रुपये प्रति क्विंटलवर आला आहे जो महिन्याच्या सुरुवातीला 2000 रुपये प्रति क्विंटल होता. त्यामुळे आता कांदा, बटाटा, टोमॅटो या भाज्यांचे दर वाढले तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक खर्चावर दिसून येईल.

News Title : Food Inflation Prices of tomato, potato, onion will increase

महत्वाच्या बातम्या –

National Pension System Rules l 1 फेब्रुवारीपासून या योजनेतील पैसे काढण्यासंदर्भात नवे नियम लागू होणार

Ramayan Lectrure In Madresahs l आता मदरशांमध्ये दिले जाणार रामायणाचे धडे! या कारणामुळे घेण्यात आला हा मोठा निर्णय

First Brain Chip in Human l बापरे! मानवाच्या मेंदूमध्ये बसवली चिप, मेंदूवर ठेवणार नियंत्रण

Today Horoscope l या राशीच्या व्यक्तींनी पैसे खर्च करताना विचार करावा

Mercedes-Benz GLA Facelift Launched l 360 डिग्री कॅमेरा फीचर्ससह Mercedes-Benz GLA कार लाँच! पाहा किंमत आणि वैशिष्ट्ये