क्रिकेटमधील बहुचर्चित वादावर दीपक हुड्डाने पहिल्यांदाच केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…

मुंबई | आपल्या देशासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न अनेक युवा खेळाडू आपल्या उराशी बाळगून पाहत असतात. त्यातील अनेक खेळाडूंना यश देखील मिळतं.

कोशिश करने वालो की हार नही होती, असा हिंदीत मुहावरा आहे. असाच काहीसा प्रकार टीम इंडियाचा नवा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डासोबत घडत आहे.

वर्षानुवर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या दीपक हुड्डाने हंगामानंतर अनेक धावा केल्या, त्यानंतर त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला.

आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर हुड्डाने अनेक मैदानं गाजवली आहेत. त्याचबरोबर ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी गोलंदाजीची धार देखील त्याने दाखवून दिली आहे.

मात्र, दीपकचा हा प्रवास काही सोपा नव्हता. काही काळापूर्वी हुड्डा बडोदा संघाकडून खेळत असताना त्याचा कृणाल पांड्यासोबत वाद झाला होता. आता तो यावर उघडपणे बोलला आहे.

दोघंही यापूर्वी बडोदा संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत होते, तसेच दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी केली होती. पण काही काळापूर्वी रणजी मोसमाच्या सरावाच्या वेळी दोन्ही खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

त्यानंतर दीपक टीमचा बायो बबल सोडून घरी परतला आणि काही वेळातच त्याने बडोद्याची रणजी टीमही सोडली. त्यावर आता दीपकने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

माझा देशांतर्गत हंगाम खूपच खराब होता. पण मी सर्व वाद बाजूला ठेवून माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केलं. वाद वगळता मला दररोज चांगले खेळाडू मिळाले असल्याचं दीपकने म्हटलं आहे.

दरम्यान, लहानपणापासून माझं टीम इंडियात खेळण्याचं स्वप्न होतं, सूर्यकुमारशी संवाद साधताना हुड्डा यांनी एक मोठं वक्तव्य केलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

“उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी अमिताभ गुप्ता यांच्या मदतीनं कट रचला”

 कर्नाटक हिजाब प्रकरणावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

रानू मंडल पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात, यावेळी केलं ‘हे’ मजेशीर काम 

Hyundai नं आणली सर्वात स्वस्त कार, टाटाच्या या कारचं मार्केट डाऊन होणार? 

“अहंकाराने त्यांनी गुजरातची दोन गाढवं म्हटलं होतं पण…”