मुंबई | राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. पहिल्याच दिवशी हे अधिवेशन वादळी ठरल्याचं पहायला मिळत आहे.
पहिल्याच दिवशी अधिवेशन वादळी होत असल्याचं दिसत आहे. पहिल्याच दिवशी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दाऊद इब्राहिम आणि मनी लाॅर्डिंग प्रकरणात नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत. 3 मार्चपर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे.
नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन भाजप आक्रमक झालं असून फडणवीसांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
‘अटकेत असलेला मंत्री मंत्रीपदावर कसा?’, असा घणाघात फडणवीसांनी केला आहे. “इतिहासात पहिल्यांदाच तुरुंगातील मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही”, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. राज्यपालांनी अभिभाषण पूर्ण केलं नाही.
राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी अभिभाषण अर्धवट सोडल्यानंही आक्रमकता पहायला मिळाली. त्यामुळे सध्या वातावरण गंभीर असल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रशिया-युक्रेन युद्ध! रशियन सैनिकांच्या मृत्यूची धक्कादायक आकडेवारी आली समोर
“सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज
“सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”
आनंदाची बातमी! महाराष्ट्रात आज कोरोनानं एकाचाही मृत्यू नाही