भारतीय खेळाडूंनी रचला नवा विक्रम! आयपीएलच्या इतिहासात प्रथमच घडली ‘अशी’ गोष्ट

नवी दिल्ली | सध्या आयपीएलचे 13वे पर्व चालू आहे. आयपीएलच्या 13व्या पार्वतील ३४ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जला पाच विकेटने हरवले. प्रथम नाणेफेक जिंकून चेन्नई संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या संघाने 180 धावांचं टार्गेट दिल्लीच्या संघापुढे ठेवले.

180 धावांचे लक्ष पार करायला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला जास्त अवघड गेले नाही. कारण या सामन्यामध्ये फलंदाज शिखर धवन याने जोरदार फटकेबाजी करत शतक ठोकले. या सामन्यात शिखर धवन याने 58 चेंडूत 101 धावा केल्या.

शिखर धवनचे आयपीएल मधील हे पहिलेच शतक आहे. या सामन्यात शिखर धवनने 14 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचबरोबर शिखर धवनने या सामन्यात अजून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अशी गोष्ट घडली आहे की, पहिले तीन शतक हे भारतीय फलंदाजांनी केले आहेत. 2020च्या आयपीएलमधील पहिले शतक किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधार केएल राहुल याने केले आहे.

केएल राहुल याने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध शतक मारले होते. या सामन्यात केएल राहुल याने 132 धावा केल्या होत्या. 2020 च्या  आयपीएल पर्वातील सर्वात जास्त धावा करणारा केएल राहुल हा पहिलाच फलंदाज आहे.

केएल राहूल याने आतापर्यंत आठ सामने खेळले आहे. यात त्याची सरासरी 74.66 आहे. त्यामध्ये त्याने 448 धावा केल्या आहेत. या आयपीएलमध्ये केएल राहुल याने एक शतक आणि चार अर्धशतक केले आहेत.

आयपीएलमधील दुसरे शतक केएल राहुलचा सोबती मयंक अग्रवाल याने केले आहे. मयंक अग्रवाल याने राजस्थान रॉयल संघाविरुद्ध शतक ठोकले होते. या सामन्यामध्ये मयंक अग्रवाल याने 106 धावा केल्या होत्या.

आयपीएल मधील सर्वात जास्त धावांच्या बाबतीत मयंक अग्रवाल याचा दुसरा क्रमांक लागतो. त्याची सरासरी 47.75 आहे. आतापर्यंत त्याने 382 धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतक केले आहे.

या आयपीएलच्या पर्वातील तिसरे शतक दिल्ली कॅपिटल्स संघाचे शिखर धवन याने केले आहे. आता नुकत्याच शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शिखर धवन याने हे शतक केले आहे.

सर्वात जास्त धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. यात त्याची सरासरी 51.28 आहे. शिखर धवन याने 359 धावा  केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पायल घोष अनुरागनंतर आता ‘या’ बड्या खेळाडूवर गंभीर आरोप करत म्हणाली…

भाजपला मोठा धक्का! एकनाथ खडसे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता अंकिता लोखंडे विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल होणार?

‘केबीसी’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट, जी पाहून अमिताभ बच्चन सुद्धा चकित झाले!

अर्णब गोस्वामीला मोठा धक्का! आता ‘या’ प्रकरणी पाय आणखी खोलात