सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्यासोबत गेली पार्टीला, फोटो होतायेत व्हायरल

मुंबई| अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. सुशांत प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणातत अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तुरूंगवास देखील झाला. या सर्व प्रकरणामुळे ती बॉलिवूड विश्वात चर्चेचा विषय ठरली होती. आता नुकतीच रिया आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे चर्चेत आली होती. आता नुकतीच ती कूल अंदाजात गेटवे ऑफ इंडियाला स्पॉट झाली. यादरम्यानचे रियाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

नुकतीच रिया चक्रवर्ती साकिब सलीम आणि मनीष मल्होत्रासोबत गेटवे ऑफ इंडियाला स्पॉट झाली. असे सांगितले जात आहे की हे कलाकार साकिब सलीमच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी भेटले होते. ही पार्टी अलिबागला झाली होती.

रिया अभिनेता साकीब सलीम सोबत दिसली होती. दोघेही अलिबागहून पार्टी करून येत होते. यादरम्यान हे दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. रियाने प्लेन टी शर्ट आणि जीन्स परिधान केले होते, तर साकीबने शर्ट व पँट परिधान केली होती. दोघेही मीडियासमोर उभे राहिले नाहीत आणि तेथून थेट निघून गेले. असे म्हटले जात आहे की, रियाने साकीबचा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा केला आहे आणि यावेळी मनीष मल्होत्रा ​​देखील त्यांच्यासोबत होता.

सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर अनेक गंभीर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली. सीबीआयकडून प्रकरणाचा तपास होत असताना यात ड्रग्ज अँगल समोर आला आणि रिया या सगळ्यात अधिक अडकत गेली.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्मह.त्येनंतर रिया चक्रवर्ती कधी नव्हे इतकी चर्चेत आली होती. त्याच्या निधनानंतर तब्बल सहा महिन्यानंतर रिया महिला दिनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली पहायला मिळाली होती. प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. रियाच्या पोस्टवर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या. काहींनी तिला ट्रोल केले. पण काही मात्र रियाची माफी मागताना दिसले.

बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 ला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मात्र त्याची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. विशेष म्हणजे ही हत्या त्याची प्रेयसी बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केल्याचा आरोप तीच्यावर केला गेला. तसेच ड्रग्सप्रकरणी रियाला अटक देखील करण्यात आली होती.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आणि ड्रग्स प्रकरणात रियाचे नाव समोर आल्यानंतर आता तिचे आयुष्य पुन्हा पूर्ववत होत आहे.

दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर आता रिया ‘चेहरे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमधून रियाला दूर ठेवण्यात आले होते. मात्र, रिया या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली होती. तिला मोठ्या पडद्यावर पाहून रियाचे चाहते देखील उत्साही झाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या –