पती राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर, म्हणाली…

मुंबई | आजकाल सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री, अभिनेते आपल्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. यासाठी ते कधी-कधी आपल्या वयक्तीक आयुष्यात घडलेल्या घटनाही शेअर करत असतात.

तसेच बॉलिवडूची अभिनेती आणि योगा मास्टर शिल्पा शेट्टीही आपल्या सोशल मीडिया आकाऊंवटवर खूप अॅक्टीव्ह असते. ती सतत आपल्या चाहत्यांसाठी दरवेळी वेगवेगळं काही तरी घेऊन येतं असते. परंतू जेव्हापासून शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला काही दिवसांपूर्वी अटक झाली आहे.

तेव्हापासून शिल्पा शेट्टी अचानक गायब झाली आहे. यादरम्यान तिचं ‘सुपर डान्सर सीझन 4’च शुटींगही सुरू होतं. मात्र तिने ते थांबवलं आहे. ती सध्या पूर्णपणे गायब असल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतू 15 ऑगस्टच्या दिवशी तिने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे.

त्या पोस्टमध्ये तिने देशाचा झेंड्याचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या असल्याचं समजतं आहे. तिच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना इतक्या दिवसांतून तिचं दर्शन झालं. त्यामुळे तिचे चाहते खूप खुश असल्याचंही दिसून येतं आहे.

यासोबतच शिल्पा शेट्टीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी इंस्टग्रामवर लाईव्ह येऊन योगेचे देखील महत्व सांगितलं आहे. शिल्पा शेट्टी कोरोना मदत निधी गोळा करणाऱ्या ‘V Of India’ या संस्थेशी संबंधित आहे. तसेच तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या योगाच्या लाईव्ह सेशनचा एक लहानसा पार्ट शेअर केला आहे.

तिची ही स्टोरी पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. इतक्या दिवसांनंतर तिने आपला चेहरा सोशल मीडियामार्फत का होईना सगळ्यांना दाखवला आहे. तिच्या या स्टोरीला अनेक चाहत्यांनी तिला कमेंट्स केल्या असल्याचं समजतं आहे. तसेच तिच्या स्वातंत्र्या दिनाच्या पोस्टलाही खूप लोकांनी कमेंट केलं आहे.

https://www.instagram.com/p/CSlVhN9DLoB/

महत्वाच्या बातम्या-

एकावं ते नवलंच! चक्क कुत्र्यानं केलं वृक्षारोपण, पाहा व्हायरल व्हिडीओ

तरूणांनी केलेल्या अपमानाचं आजोबांनी दिलं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

आईस्क्रिम खाता-खाता बायकोने असं काही केलं की नवऱ्याचे डोळेच फिरले, पाहा व्हिडीओ

प्रॉपर्टीवर डोळा असलेल्या नातवाला आजीने दिलं जबर उत्तर, पाहा व्हिडीओ

वडिलांच्या चुकीची शिक्षा आईने दिली पोटच्या मुलाला; जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ