गृहमंत्री अमित शहांची तब्येत बरेहोईपर्यंत भाजपचा ‘हा’ नेता ठेवणार रोजा

मुंबई | सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना गुरुग्राम मधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच अनेक लोक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

आता भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं अमित शहा यांच्यासाठी रोजा ठेवण्याचा निर्धार केला आहे. जम्मू आणि काश्मिर मधील भारतीय जनता पक्षाचे नेते गुफ्तार अहमद यांनी अमित शहा यांच्या आरोग्यासाठी आता अल्लाहतालाकडे प्रार्थना करत मंगळावर पासून रोजा धरणार असल्याचं सांगितलं आहे.

अमित शहा संपूर्ण बरे होईपर्यंत हा रोजा ठेवणार असल्याचं गुफ्तार अहमद यांनी म्हटलं आहे. गुफ्तार यांनी ट्विटर वरून एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.

दरम्यान, अमित शहा यांनी ट्विट करत आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली होती. अमित शहा यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन होण्याचा त्याबरोबरच चाचणी करून घेण्याचा सल्लाही दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

विकृतीचा कळस! चिमुरडीला पॉर्न दाखवत नराधमानं केला बलात्कार, अन् मग गावकऱ्यांनी उचललं ‘हे’ पाऊल

धक्कादायक! प्रेमाचं नाटक करत विधवा महिलेवर ‘या’ नेत्याने केला बलात्कार

मॅडम, मुंबई पोलिसांची सुरक्षा घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?, मग…; अमृता फडणवीसांना शिवसेनेचे प्रत्युत्तर!

लफडेबाज सुशांतची लायकी तरी काय आहे त्याने आत्महत्याच केली असावी’; संभाजी भिडेंची सुशांत आत्महत्या प्रकरणात उडी

धक्कादायक! पुण्यात पोलिसांनीच घडवून आणला शेतकऱ्यावर खुनी हल्ला अन् मग…