…अन् तीन दिवस रतन टाटा ताज हॉटेलच्या बाहेर पादचारी मार्गावरच थांबले होते

मुंबई | २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत ह.ल्ला झाला होता. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ असलेल्या ताज हॉटेलमध्ये दह.शतवा.दी हल्ला झाला होता. दह.शतवा.द्यांनी जेव्हा ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला होता, ही माहिती मिळाल्यानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा स्वतः तिथे उपस्थित होते. ताज हॉटेलमध्ये गो.ळीबार चालू असल्याने सुरक्षा रक्षकांनी रतन टाटा यांना आत जाऊ दिले नाही.

रतन टाटा यांनी स्वतः या घटनेबद्दल माहिती दिली आहे. रतन टाटा यांनी नॅशनल जिओग्राफिकचा मेगा आयकॉन या दुसऱ्या पर्वामध्ये दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मुंबईतील २६/११ चा दह.शतवा.दी ह.ल्ला झाल्यानंतर रतन टाटा पहिल्यांदा ताज हॉटेलमध्ये गेले होते, त्यांनी हा अनुभव यात सांगितला आहे.

रतन टाटा यांनी सांगितले,”२६ नोव्हेंबर २००८ रोजी मला कोणीतरी फोन करून सांगितले की, ताजमध्ये गो.ळीबार झाला आहे. त्यानंतर मी ताजच्या एक्सचेंजला फोन केला, पण कोणीही फोन उचलला नाही. हे मला अगदी विचित्रच वाटलं. मग मी स्वतः गाडी घेऊन तिथे पोहोचलो. मी ताज हॉटेलच्या लॉबीमध्ये जाण्यास निघालो, पण सुरक्षा रक्षकांनी मला आता जाऊ दिले नाही.”

मग त्यानंतर रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आर. के. कृष्णकुमार यांना फोन करून याबद्दल माहिती दिली. आर. के. कृष्णकुमार यांनी त्या दिवसाची आठवण सांगताना म्हणाले, “ताजमध्ये काहीतरी गडबड झाली आहे. तिथे गो.ळीबार सुरू आहे, असं मला रतन टाटा यांनी फोन करून सांगितलं.”

या मुलाखतीमध्ये रतन टाटा यांनी सांगितलं की, “ज्यावेळी ह.ल्ला झाला, त्यावेळी ताजमध्ये ३०० पाहुणे होते. हॉटेलमधील अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास कर्मचाऱ्यांना खूपच कष्ट घ्यावे लागले. त्यावेळी आपत्कालीन कोणतीही व्यवस्था नसतानाही त्यांनी अनेकांना सुखरूप बाहेर काढले, पण काही लोकांना आपला जी.व ग.मवावा लागला.”

या घडलेल्या प्रसंगामध्ये रतन टाटा हे ताजमधील  व्यवस्थापन आणि तेथील कर्मचाऱ्यांसोबत खंबीरपणे उभे होते. २६/११ रोजी ह.ल्ला झाला, पुढील तीन दिवस आणि तीन रात्र ताज हॉटेलच्या बाहेर रतन टाटा यांनी पादचारी मार्गावरच काढले, असं आर. के. कृष्णकुमार सांगताना म्हटले. रतन टाटा त्या आठवणी सांगताना म्हणाले,”हे सर्व घडल्यानंतर मी आणि कृष्णकुमार वसबी रेस्टॉरंटमध्ये गेलो. त्याच ठिकाणी शेवटचा गो.ळीबार झाला होता.

पुढे बोलताना म्हणाले, “आत गेल्यावर तिथे भिंतीवर गो.ळ्यांचे निशाण होते, काचा फुटल्या होत्या, सर्व वॉलपेपर जळाले होते. तेव्हा तिथे वीजही नव्हती, त्यामुळे आम्हाला भीती वाटली. तेथील ह.ल्ला थांबला आहे. यावर लवकर विश्वास बसला नाही, कारण मेंदू ह.ल्ला थांबल्याच सांगत होत. परंतु तेथील परिस्थिती पाहून मेंदू त्यावर विश्वास ठेवत होता, असा काहीशी संभ्रम परिस्थिती निर्माण झाली होती.” ताजवरील हा ह.ल्ला झाल्यानंतर रतन टाटा आणि आर. के. कृष्णकुमार हे स्वतः ज.खमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात जाऊन भेटले.

तिथे जाऊन समजलं की, अनेक कर्मचाऱ्यांनी त्यात प्रा.ण गमावले होते. त्यानंतर त्या सर्वांना आम्ही मदत करण्यासाठी सार्वजनिक कल्याण ट्रस्ट सुरू करण्याचा विचार केला आणि याची सुरुवात ताजपासून केली. “त्या ह.ल्ल्यात म.रण पावलेल्या व्यक्तींचा निवृत्ती वयापर्यंतचा पगार आम्ही त्यांच्या कुटुंबियांना दिला आणि त्यांच्या मुलांची सर्व शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली. आम्हाला हे सगळं करता आलं, याचा आम्हाला अभिमान आहे.” अशा आठवणी रतन टाटा यांनी मुलाखतीत सांगितल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

अभिनेता सोनू सूद आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘या’ प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित!

‘अनुराग कश्यप पोलिसांना खोटं बोलत आहे’; अनुरागच्या ‘त्या’ स्टेटमेंटवर पायल घोष भडकली

सोशल मीडियावरून अमिताभ बच्चन यांची घोषणा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

कोरोना संपत नाही तोच चीनमध्ये आलं नवं संकट; आलाय ‘हा’ नवा व्हायरस

‘रिया शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याच्या संपर्कात होती’; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक खुलासा!