Top news मनोरंजन

रेखानं ‘या’ कारणाने बहिणीला चित्रपट सृष्टीत येवू दिलं नाही

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री आणि लाखो लोकांच्या हृदयावर धडकणाऱ्या रेखाचा आज 66वा वाढदिवस आहे. केवळ 14 वर्षांची असताना रेखानं चित्रपट सृष्टीत पाय ठेवला होता. रेखानं बॉलीवूडमध्ये पाच दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं गाजवला आहे.  तसेच आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रेखा 14 वर्षांची असताना घरातील परिस्थितीमुळे तिला चित्रपट सृष्टीत काम करावे लागले. रेखाने कदाचित नाईलाज म्हणून अभिनयाची निवड केली असेल. चित्रपट सृष्टीत आल्यानंतर रेखानं प्रचंड मेहनत घेतली. आपल्या अभिनयातून आणि सौंदर्यातून तिनं प्रेक्षकांना भुरळ घातली आणि आज चित्रपट सृष्टीत एक वेगळी उंची गाठली आहे. मात्र, तिनं आपली धाकटी बहिण राधा हिला केव्हाच चित्रपट सृष्टीत येवू दिलं नाही.

रेखाच्या मते चित्रपट सृष्टी ठीक नाही. रेखानं आयुष्यात जो संघर्ष केला तो आपल्या बहिणीला करावा लागू नये, म्हणून रेखानं तिची धाकटी बहिण राधाला चित्रपट सृष्टीत येवू दिलं नाही.

रेखाच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  रेखाच्या चित्रपटांबरोबरच तिचं सौंदर्य आणि प्रेम प्रकरण याविषयी आज देखील चर्चा रंगते. ज्यावेळी इंडस्ट्रीतील प्रेम प्रकरणांविषयी बोललं जातं त्यावेळी अभिनेता अमिताभ बच्चन आणि रेखाचं नाव हमखास घेतलं जातं.

काही काळापूर्वी महानायक अमिताभ बच्चन आणि रेखाची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत होती. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. मात्र, त्यांची ही प्रेम कथा पूर्ण होऊ शकली नाही. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नानंतर रेखाचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं.

50 वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या रेखाला कधीच चित्रपट सृष्टीत येण्याची इच्छा नव्हती. पण परिस्थितीमुळे तिने चित्रपट सृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. तिच्या या यशामागे तिचा कठोर संघर्ष दडलेला आहे.

रेखा दक्षिण भारतातून आल्यामुळे तिला हिंदी बोलण्यात खूप अडचणी येत होत्या. इतकचं नाही तर अभिनय करताना वापरले जाणारे दागिने, कपडे आणि मेकअप अशा गोष्टी करतानाही तिला अनेक अडचणी यायच्या.

मात्र, रेखानं आपल्या प्रयत्नानं या सर्व अडचणींवर मात केली. तिनं हिंदी भाषेवरही प्रभुत्व मिळवलं. इंडस्ट्रीत रेखाला सर्वजण पोपट म्हणतात कारण तिला अनेक भाषेतील संवाद जमतो.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी बोलताना आता उर्वशीनंही सांगितलं पडद्यामागचं सत्य म्हणाली…

रेखा सध्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते? वाचा काय म्हणाली होती रेखा

चित्रपट सृष्टीवर पुन्हा पसरली शोककळा! आणखी एका बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

आता कंगणा राणावत नव्या वादात; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

रंगीन ख्रिस गेल… क्रिकेटसोबतच ‘या’ गोष्टीचाही लुटतोय मनमुराद आनंद!