मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी ‘सांड की आँख’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तापसी पन्नू, भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सांड की आँख’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दोघीही आपल्या वयानं दुप्पट असलेल्या भूमिका साकारत आहेत. तरुण मुलींनी ज्येष्ठ व्यक्तींच्या भूमिका साकरण्यापेक्षा त्या जागी बॉलिवूडमधल्या ज्येष्ठ अभिनेत्रींचा विचार अशा भूमिकांसाठी करायला हवा’, असं मत नीना यांनी व्यक्त केलं आहे.
सांड की आँख’ हा चित्रपट वयाची साठी ओलांडलेल्या शार्पशूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्यावर आधारलेला आहे. तापसी आणि भूमी या दोघींनी चंद्रो आणि प्रकाशी यांची भूमिका साकारली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर अनेक ट्विटर युजर्सनं या भूमिकांसाठी नीना कुलकर्णी, शबाना आझमी आणि जया बच्चन यांचं नाव सुचवलं होतं. बॉलिवूडमधल्या या ज्येष्ठ अभिनेत्री या भूमिकेत शोभून दिसल्या असत्या असंही अनेक ट्विटर युजर्सचं मत पडलं असल्याचं समजतंय.
‘आमच्या वयाच्या भूमिका तरी किमान आमच्याकडून करून घ्या’, अशी नाराजी नीना गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, माझ्याकडे सध्या काम नाही त्यामुळे जाहीरपणे काम मागण्यास मला लाज वाटत नाही असं नीना यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बँका बुडत आहेत…पैसा कुठेच सुरक्षित राहिला नाही- जितेंद्र आव्हाडhttps://t.co/JXxb2CNTH8 @Awhadspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019
पुन्हा एकदा जूही चावला दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत – https://t.co/jXeIAkQnAs @iam_juhi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019
युतीच्या जागावाटपाचा प्रश्न भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही भयंकर- संजय राऊत https://t.co/UDhwhjbutu
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019