‘या’ कारणामुळे बाबिलनं वडिल इरफान खानच्या आठवणी शेअर करणं सोडून दिलं, वाचा काय आहे कारण

मुंबई| बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल सोशल मीडीयावर सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट शेअर करताना पहायला मिळतो.

चाहते अद्याप त्यांच्या लाडक्या अभिनेत्याला विसरलेले नाहीत. इरफानचा मुलगा बाबिल आणि त्याची पत्नी सुतापा या अभिनेत्याची आठवण म्हणून सोशल मीडियावर नेहमी काहीना काही पोस्ट करत असतात. इरफान खानप्रमाणेच त्याचा मोठा मुलगा बबिल खान यानेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर करणं अचानक बंद केलं. यापूर्वी तो त्यांचे परिवाराचे फोटो, काही गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करायचा, पण काही आठवड्यांपासून त्याने अशी कोणतीही पोस्ट केली नाही. त्याच्या चाहत्यांनी त्याला याबद्दल विचारलं असून त्याने आता यामागचं कारण सांगितलं आहे.

इरफान गेल्यानंतर बाबिल त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करत होता. ते इरफान यांच्या चाहत्यांनाही आवडते होते. परंतु अचानक बाबिलने आठवणी पोस्ट करणे थांबवले. ते पाहून एका युझरने त्याला विचारले तू आता इरफान यांच्या आठवणी का शेअर करत नाही. त्यावर बाबिलने जे उत्तर दिले ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसला.

बाबिलने सांगितले, मला बाबांच्या आठवणी तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करणे खूप आवडत होते. परंतु या साऱ्या आठवणी मी स्वतःचे प्रमोशन करण्यासाठी करत आहे, असे मेजेस वारंवार येऊ लागले. यामुळे मला खूप वाईट वाटले. मी खूप दुखावलो गेलो. माझा असा काहीच उद्देश नव्हता.

पुढे  तो म्हणाला की, बाबांच्या चाहत्यांना केवळ त्यांची उणीव भासू नये, त्यांच्या काही आठवणी चाहत्यांना कळाव्यात या उद्देशाने मी हे पोस्ट करायचो. परंतु या प्रतिक्रिया आल्यामुळे मी आता गोंधळून गेलो आहे की नेमके आता काय करू. मी सर्वप्रथम त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या नावाचा वापर करून मला प्रसिद्धी मिळवायची नाही. आता योग्य वेळ आल्यानंतरच मी त्यांच्या आठवणी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करणार आहे.

दरम्यान, बाबिलला अभिनेता बनायचे आहे असे त्याने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते आणि आता त्याला चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळाली असून अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याला लाँच करणार आहे.

अलीकडेच बाबिलने इरफान खानच्या डायरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या डायरीमध्ये इरफानने लेक बाबिल याच्यासाठी काही अभिनयाच्या नोट्स लिहून ठेवल्या आहेत. लवकरच बाबील बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे. बाबीलने लंडनच्या फिल्म स्कूलमधून पदवी शिक्षणही घेतले आहे.

babil khan

महत्वाच्या बातम्या – 

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

‘उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद’ प्रिया बापटच्या…

युजवेंद्र चहलला पहिली विकेट मिळताच पत्नि धनश्रीला अश्रू…

सैराटमधील आर्चीचा नवा लूक पाहिलात का?, नसंल पाहिला तर पाहा…

‘मास्क मुक्ती’ देणारा जगातील पहिला देश!…