धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!

चोरांनी चोरी करणं आणि सामान कुठेतरी लपवणं यात काही नवीन गोष्ट नाही. अशीच काहीशी घटना मुंबईतील जुहू परीसरात घडली आहे. मात्र मुंबईच्या जुहू परिसरात एका अल्पवयीन चोराने चक्क मॅनहोलमध्ये चोरी केलेलं 21 लाखांचं सोनं लपवल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

चोरी करणारा मुलगा पहिले मोबाईल चोरी करायचा आणि हे चोरलेले मोबाईल सांडपाण्याच्या नळीत लपवायचा. त्याची ही चोरी करण्याची पद्धत पाहून पोलिस देखील आश्चर्यशकीत झाले.

मुंबईतील नेहरु नगरमध्ये पूजा नावाची महिला आपल्या परीवारासह राहत होती. ती तिच्या परिवारासह महाबळेश्वरला फिरायला गेली होती. फिरुन घरी आल्यानंतर घरातून तब्बल 21 लाखांचं सोनं चोरीला गेलं असल्याचं पूजाच्या लक्षात आलं. त्यानंतर तिनं जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

तक्रार केल्यानंतर पोलीसांनी याप्रकरणी चौकशी करत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांना पहिल्यांदा शेजारी राहणाऱ्यांवर संशय आला. त्यानंतर चौकशीदरम्यान त्यांना संबंधित मुलगा 9 वी नापास असून काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात असल्याचं समोर आलं. परिसरातील चोरट्या मुलानं आपल्या मित्रांसोबत पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी त्याने बिअरची ऑर्डर दिल्याचे समोर आलं.

चोरी करणाऱ्या मुलाचे वडिल टेम्पो चालक आहेत, घरातील परीस्थिती हालाकिची असतानाही त्याने इतक्या महागड्या किमतीच्या बिअरची ऑर्डर करण्यासाठी पैसे कुठुन आलं? असा प्रश्न पोलिसांना पडला. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली.

पोलिसांच्या चौकशीमध्ये त्या अल्पवयीन चोरानं आपला गुन्हा मान्य केला. परिसरातील मॅनहोलमध्ये उतरुन गटारात सोनं लपवल्याची कबुली त्याने दिली. त्याचबरोबर त्यानं सोनं चोरण्याआधी तो मोबाईल चोरी करुन तिथेच लपून ठेवायचा, अशीही कबुली संबंधित मुलानं यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या –

पूजा चव्हाण प्रकरण: मुसक्या आवळायच्या तर वाट कसली बघताय?- चित्रा वाघ

जाणून घ्या शरीरासाठी गुणकारी असणाऱ्या काळ्या तांदळाविषयी, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

सोन्याचा आजचा भाव, 9,000 रुपयांनी सोनं स्वस्त, वाचा ताजे दर

पेट्रोलशिवाय चालणाऱ्या ‘या’ गाड्या लवकरच येणार बाजारात

उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे