Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणी कलम 302 लागणार? ‘या’ कारणानं सिद्धार्थ पिठानी सीबीआयच्या रडारवर

मुंबइ | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं असून सीबीआय सुशांत प्रकरणातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.  सुशांत प्रकरणी रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी हा सुशांत प्रकरणातील अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. सिद्धार्थ पिठानी सुशांतच्या अगदी जवळचा मित्र होता. सुशांत आणि सिद्धार्थ एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. यामुळे सीबीआयनं सुशांत प्रकरणी आत्तापर्यंत अनेकवेळा सिद्धार्थ पिठानीचा जबाब नोंदवला आहे. अशातच आता सीबीआयनं सिद्धार्थचा अंतिम जबाब 4 ऑक्टोबरला घ्यायचं ठरवलं आहे.

सुशांतचा ज्या दिवशी मृ,त्यू झाला त्यादिवशी सिद्धार्थ त्याच्या वांद्रे येथील त्याच फ्लॅटवर होता. सुशांतचा मृ.त्यू झाल्यानंतर सुशांतच्या बेडरूमचा दरवाजा उघडताना सिद्धार्थ तिथेच होता. फासावर लटकलेला सुशांतचा मृ.तदेह फासावरून आपणच खाली घेतला असल्याचं सिद्धार्थनं सांगितलं होतं. त्यामुळे याप्रकरणी सिद्धार्थची साक्ष खूप महत्वाची ठरणार आहे.

सिद्धार्थ पिठानी सीबीआयला दिलेले जबाब सातत्यानं बदलत आहे. सुशांतचा मृ.त्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी सुशांत मध्यरात्री 1 वाजता आपल्या रूममध्ये येऊन गेला होता, असं सिद्धार्थनं म्हटलं होतं. पण दुसरीकडे सुशांत त्या रात्री 2 वाजता रियाच्या घरासमोर दिसला होता, असा खुलासा एका प्रत्येक्षदर्शीनं केला आहे.

सुशांत प्रकरणी सिद्धार्थ महत्वाचा साक्षीदार आहे मात्र  सिद्धार्थ आपले जबाब वारंवार बदलतोय हे सीबीआयच्या लक्षात आल्यानं कलम 164 नुसार 4 ऑक्टोबरला सिद्धार्थची साक्ष घेतली जाणार आहे. 4 ऑक्टोबरला सिद्धार्थनं दिलेली साक्ष हि अंतिम साक्ष मानण्यात येणार आहे. काही साक्षीदारांच्या उपस्थितीत सिद्धार्थची  साक्ष लिहून घेतली जाणार आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून सीबीआय सुशांत प्रकरणी तपास करत आहे. सुशांत प्रकरणात आत्तापर्यंत समोर आलेले पुरावे पाहता सीबीआय सुशांत प्रकरणी कलम 302 लावण्याचा विचार करत आहे. सुशांत प्रकरणी कलम 302 लागल्यानंतर सुशांत प्रकरणातील गुन्हेगारांना 302 कलमांतर्गत येणारी शि.क्षा होऊ शकते.

दरम्यान, रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमध्ये सीबीआयला अं.मली पदार्थांचा उल्लेख आढळला होता. यानंतर एनसीबीनं रियाला ता.ब्यात घेत अं.मली पदार्थ प्रकरणी शोध सुरू केला होता. रियाच्या अ.टकेनंतर याप्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. तसेच काही ड्र.ग्ज पेड.लर्सलाही एनसीबीनं ता.ब्यात घेतलं आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर आणि सारा अली खान यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. शनिवारी एनसीबीनं सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोन यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं होतं.

तसेच अभिनेता शाहरुख खान, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर आणि डिनो मोरिया या बड्या कलाकारांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणी या बड्या कलाकारांची नावे समोर आल्यानं इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…अन् तीन दिवस रतन टाटा ताज हॉटेलच्या बाहेर पादचारी मार्गावरच थांबले होते

अभिनेता सोनू सूद आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘या’ प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित!

‘अनुराग कश्यप पोलिसांना खोटं बोलत आहे’; अनुरागच्या ‘त्या’ स्टेटमेंटवर पायल घोष भडकली

सोशल मीडियावरून अमिताभ बच्चन यांची घोषणा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

कोरोना संपत नाही तोच चीनमध्ये आलं नवं संकट; आलाय ‘हा’ नवा व्हायरस