नवी दिल्ली| नवीन घरी शिफ्ट केल्यानंतर शेजारील लोकांशी ओळखी वाढवण्यासाठी बरेच लोक वेगवेगळे नुस्के आजमावत असतात. शेजाऱ्यांशी जवळीक वाढावी यासाठी त्यांना नाश्ता करायला बोलावणे, त्यांच्याशी गोड बोलणे, असे वेगवेगळे मार्ग अवलंबवले जातात. मात्र एका जोडप्यानं तर शेजाऱ्यांसाठी ओळख बनवण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबवलेला पहायला मिळाला.
अमांडा आणि थाॅमस इव्हान्स हे जोडपं अमेरिकेतील फ्लोरिडा इथं राहत होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे जोडपं एका नव्या जागेत शिफ्ट झालं. कोरोना सुरु होण्याच्या आधी घर बदलण्याचं ठरवल्यानं फोर्ट मेयर्स येथे राहणाऱ्या या जोडप्याने कोरोना काळात केप कोरळ येथे स्थलांतर केलं.
नवीन जागी शिफ्ट झाल्यानं या जोडप्यानं आपल्या नवीन शेजाऱ्यांशी ओळख निर्माण करण्यासाठी एक खास गिफ्ट दिलं. तेथील शेजाऱ्यांसोबत ओळख करुन घेण्यासाठी या जोडप्याने त्यांना मोफत बिअर बाॅटल वाटल्या आहेत.
अमांडा हीने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे सध्या वातावरण इतकं वेगळं आहे की लोकांना नेमकं काय वाटतं याची त्यांना खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी घराबाहेर एक बॅनर लावला. त्या बॅनरवर त्यांनी तेथे नवीन असून त्यांना तिथल्या लोकांसोबत ओळख करुन घ्यायची आहे. तसेचं त्यांच्या शेजारच्यांना भेटायची त्यांना खुप इच्छा आहे आणि त्यासाठी ते वरांडामध्ये बिअर घेऊन थांबत असल्याचं त्यांनी त्या बॅनरवर लिहिलं होतं.
अमांडा आणि तिच्या नवऱ्याला याची खात्री नव्हती की कुणीतरी येईल. मात्र ‘मोफत बीअर’ची पाटी दिसल्यावर लोकांची झुंबड उडाली. थॉमस म्हणतो, ‘कुठंही फ्री बीअरची पाटी पाहून लोकांनी आकर्षित होणं हे मोठंच गमतीदार आहे. लोकांना मैत्री जोडण्यासाठी बोलावतानाही हा एक मस्तच मार्ग असू शकतो. आम्ही याचा अनुभव घेतला आहे.’ मैत्रीत नव्यानं संवाद सुरू करण्यासाठी हे असं काहीतरी करणं छानच आहे.
दरम्यान, कोठेही मोफत बिअरची पाटी पाहून लोकांनी आकर्षित होणं हे फार गमतीदार आहे, असं मुलाखतीदरम्यान थाॅमस म्हणाले. मोफत बिअर ठेऊन लोकांना मैत्रीसाठी बोलावणं हा सोपा मार्ग आहे, असं देखील थाॅमस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून…
आज सोन्याच्या भावात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा…
जुलियो रिबेरोंनी शरद पवारांचा ‘हा’ प्रस्ताव…
सेकंड हँड कार घेताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या…
गृहमंञी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल शरद पवारांचा मोठा…