भूतकाळ विसरत भविष्याचे वेध; रिया चक्रवर्तीनं पहिल्यांदाच शेअर केला स्वतःचा फोटो

मुंबई| अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. सुशांत प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणातत अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तुरूंगवास देखील झाला. या सर्व प्रकरणामुळे ती बॉलिवूड विश्वात चर्चेचा विषय ठरली होती. आता नुकतीच रिया आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे.

सुशांतच्या निधनानंतर रिया सोशल मीडियापासूनही लांबच होती, मात्र आता हळूहळू रिया नव्याने सुरुवात करताना दिसतेय. सोशल मीडियावरही ती ब-यापैकी सक्रिय झाली आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आणि ड्रग्स प्रकरणात रियाचे नाव समोर आल्यानंतर आता तिचे आयुष्य पुन्हा पूर्ववत होत आहे.

रिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे आणि बर्‍याच पोस्ट शेअर करतेय. तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये एक वेगळा मॅसेज आहे. रियानं नुकतंच पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये ती रवींद्रनाथ टागोर यांचं पुस्तक वाचत आहे. रियाने हा फोटो शेअर केला आहे आणि रवींद्रनाथ टागोर यांची एक ओळही कॅप्शनमध्ये लिहिली आहे.

रियाची ही पोस्ट वाचल्यानंतर असं वाटतंय की ती आता सुशांतच्या  दु:खातून बाहेर पडतेय आणि पुन्हा एकदा आपलं आयुष्य एका नव्या मार्गाने जगण्यास सुरुवात करत आहे.

सुशांतच्या निधनानंतर आता रिया ‘चेहरे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमधून रियाला दूर ठेवण्यात आले होते. मात्र, रिया या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली होती. तिला मोठ्या पडद्यावर पाहून रियाचे चाहते देखील उत्साही झाले आहेत.

दरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर अनेक गंभीर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली. सीबीआयकडून प्रकरणाचा तपास होत असताना यात ड्रग्ज अँगल समोर आला आणि रिया या सगळ्यात अधिक अडकत गेली.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्मह.त्येनंतर रिया चक्रवर्ती कधी नव्हे इतकी चर्चेत आली होती. त्याच्या निधनानंतर तब्बल सहा महिन्यानंतर रिया महिला दिनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली पहायला मिळाली होती. प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. रियाच्या पोस्टवर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या. काहींनी तिला ट्रोल केले. पण काही मात्र रियाची माफी मागताना दिसले.

बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 ला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मात्र त्याची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. विशेष म्हणजे ही हत्या त्याची प्रेयसी बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केल्याचा आरोप तीच्यावर केला गेला. तसेच ड्रग्सप्रकरणी रियाला अटक देखील करण्यात आली होती.

 

महत्वाच्या बातम्या – 

…अन् म्हशीने सिंहाला शिंगावर उचलून आदळलं; पाहा जबरदस्त…