मुंबई | देशात सध्या पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांची तयारी चालू आहे. भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक वादाला आता सुरूवात झाली आहे. अशात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काही दिवसांपू्र्वी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पेटलेला वाद शांत होत नाही तोच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींसह भाजपवर जहरी टीका केली आहे.
देशातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. कारण मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. पण मोदी सरकार देशातील बेरोजगारीकडं अजिबात लक्ष देत नाही, असं चव्हाण म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. देश सध्या हुकूमशाहीकडं वाटचाल करत आहे. मोदींच्या हुकूमशाहीकडील वाटचालीला केवळ काॅंग्रेसच रोखू शकतं, असं चव्हाणा म्हणाले आहेत.
देशातील लोकशाही आणि देशाचं संविधान आम्हाला वाचवायचंय. देशाची अर्थव्यवस्था कोलमडत चालली आहे, असं चव्हाण म्हणाले आहेत. परिणामी भाजप आणि काॅंग्रेसमधील वाद वाढण्याची शक्यता आहे.
सध्या विधानसभेची निवडणूक होत असलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तर एका राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे. परिणामी भाजप आणि काॅंग्रेसमध्ये जोरदार वाद रंगला आहे.
नरेंद्र मोदी केवळ भाषणबाजी करतात, त्यांना केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत. नरेंद्र मोदी देशाकडं लक्ष देत नाहीत, अशी जहरी टीका चव्हाण यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.
येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या काॅंग्रेस स्वबळावर लढणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचा प्रयोग केल्याचंही चव्हाण म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
LICची भन्नाट योजना! दर महिन्याला मिळणार 12 हजार रूपये
रोहित पवारांनी व्यक्त केली मंत्री होण्याची इच्छा, म्हणाले…
पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी
लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्येच; प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
सलमान खानचं टेन्शन संपेना! शेजाऱ्यानेच केलेत धक्कादायक आरोप