माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या, हे कारण आलं समोर

बंगळुरू | भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांची नात सौंदर्याने आत्महत्या केली आहे. बंगळुरूत ही घटना घडली.

येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने सौंदर्याने आत्महत्या केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच तिचे पार्थिव बॉरिंग अँड लेडी कर्जन रुग्णालयात (Bowring and Lady Curzon Hospital) पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. सौंदर्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. सौंदर्याने नैराशात्यून आत्महत्या केली असावी, असं पोलीस सांगितलं आहे.

30 वर्षीय सौंदर्या ही बंगळुरूच्या एमसएस रमैया रुग्णालयात डॉक्टर होती. येथील माऊंट कार्मेल कॉलेजजवळील एका अपार्टमेंटमध्ये सौंदर्या ही तिचा पती आणि सहा महिन्याच्या बाळासोबत राहत होती.

सौंदर्या यांच्या घरातील मोलकरणीने घराचा दरवाजा वारंवार वाजवला. मात्र कोणीच आवाज दिला नाही. त्यामुळे मोलकरणीने नीरज यांना फोन करून याबाबतची माहिती दिली.

नीरज यांनी सौंदर्या यांना फोन केला. मात्र, काहीच रिप्लाय आला नाही. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सौंदर्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला.

डॉ. सौंदर्या व्ही वाय यांनी आज सकाळी वसंत नगर येथील फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं. सौंदर्या यांनी डॉ. नीरज एस यांच्यासोबत 2018मध्ये विवाह केला होता.

दोघेही एकाच रुग्णालयात काम करत होते. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, नीरज आज सकाळी 8 वाजता रुग्णालयात जाण्यासाठी निघून गेले होते. नीरज हे रुग्णालयात गेल्यावर दोन तासाने सौंदर्या यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 भय्यू महाराज प्रकरणाला नवं वळण; अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“मिस कॉल देऊन जगातला मोठा पक्ष व्हायचं नाही”; नानांचं भाजपवर टीकास्त्र

  “…त्यावेळी भारतीय क्रिकेट कणाहीन बनेल”; रवि शास्त्रींचं मोठं वक्तव्य

अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”

महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर