निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी, शिवसेनेचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सगळं ठरलं होतं, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

विधानसभेची निवडणूक आम्ही युती म्हणून लढलो होतो. मात्र आमच्या जागा कमी यायला पाहिजेत असं काहीसं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आधीच ठरलं होतं. त्यावेळी वाटलं होतं की हे सगळं स्थानिक पातळीवर होतं आहे. जसं पुण्यात झालं, पुण्यात थेट राष्ट्रवादीने शिवसेनेला मदत केली. त्यामुळे आमच्या दोन जागा पुण्यात गेल्या. नंतर लक्षात आलं की त्यांचं सगळं आधीच ठरलं होतं, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

आम्हाला 120-125 जागा मिळायला हव्या होत्या मात्र आम्हाला 105 च जागा मिळाल्या. थोड्या थोड्या मतांनी आमच्या भरपूर जागा गेल्या. मात्र या शिवसेनेला मोठा फटका बसला. कारण शिवसेनेच्या फक्त 56 जागा विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात त्यावेळी इतकं सगळं चांगलं वातावरण होतं की आमच्या 130 जागा येऊ शकल्या असत्या आणि शिवसेनेच्या जागा 90 च्या आसपास जागा येऊ शकल्या असत्या. मात्र जे काही शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरलं होतं त्याचा फटका बसला.

महत्वाच्या बातम्या-

-ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

-…तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करु नका; रेल्वे प्रशासनाचं आवाहन

-महाराष्ट्रातील 104 वर्षे जुन्या सहकारी बँकेचा परवाना रद्द; लॉकडाऊनमध्ये खातेधारकांची आर्थिक कोंडी

-“कोरोनावर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर औषध भारताने मिळवलं पाहिजे”

-“मराठी माणूस ही घटना, त्यामागची माणसं आणि त्यामुळे भळभळलेली जखम कधीही विसरणार नाही..”