मुंबई | सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार हे पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावं. कशा प्रकारे त्यांनी गरीबांना मदत केली पाहिजे. तसंच दुकानदारांना, फुटपाथवर बसणाऱ्यांना, छोट्या उद्योगांना कशाप्रकारे मदत केली पाहिजे याविषयी त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. त्यांच्याकडून केवळ राजकारण सुरु आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. पण राज्य सरकारकडून कोरोनाचा योग्यरित्या सामना केला जात नाही. अनेक लोकांना उपचार मिळत नाहीत, असं फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत. केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही त्यांना रेशन पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच धान्य मिळत नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-इतर राज्यांप्रमाणे शेतकरी, बारा बलुतेदारांना पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस
-…म्हणून हा परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो हातात घेऊन यूपीला रवाना झाला!
-मन मोठं असावं लागतं… भिकाऱ्याने 100 कुटुंबाला दिलं महिन्याभराचं राशन आणि 3 हजार मास्क
-“राहुल गांधींनी मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्याने निर्मलाताईंना दुख: झालं हे अक्रितच”
-प्रेक्षकांशिवाय मॅच खेळणं म्हणजे नवरीशिवाय लग्न करणं- शोएब अख्तर