अहमदनगर | माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarroa Gadhakh) यांनी बंडखोर आमदारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेतील आमदारांची खदखद चार महिन्यांपूर्वी आपल्याला समजली होती, असा गौप्यस्फोट गडाख यांनी केला आहे. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
मी जरी अपक्ष म्हणून निवडून आलेलो असलो तरी मी काही सिद्धांतावरती उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबरोबर आलेलो होतो. त्यानुसार मी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला असल्याचं शिवसेनेचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितलं आहे.
आमदार नाराज होते ही वस्तुस्थिती असून राजकीय नाराजी असेल काही कामाच्या बाबतीत असेल त्या त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी मिटिंग घेण्याचा प्रयत्न केला, असं त्यांनी सांगितलं.
आम्हाला सर्वाना सूचना दिल्यानंतर आम्ही देखील त्या आमदारांचं काम करण्याचा प्रयन्त केला, पण इतकी मोठी नाराजी आणि त्यातून इतका मोठी घटना होईल अशी अपेक्षा आम्हालाच नाही तर उद्धव ठाकरेंना सुद्धा नसावी पण दुर्दैवाने ते झालेलं आहे, असं शंकरराव गडाख म्हणाले.
शिंदे फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्द केले आहेत. मात्र जनतेच्या हिताचे निर्णय हे सरकार रद्द करणार नाही, अशी अपेक्षा देखील गडाख यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कारवाईच्या आदेशानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंनाच चॅलेंज, म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा, शिवसेनेत नाराजीचा सूर
लाज वाटत नाही का? उर्फी जावेदची साडी पाहून नेटकरी संतापले, पाहा व्हिडीओ
अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाचा देशमुखांना आणखी एक दणका
‘आपल्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले’, उद्धव ठाकरेंचं शिवसेना आमदारांना भावनिक पत्र