शिवसेनेला मोर्चाच काढायचा होता तर ‘वर्षा’ बंगल्यावर का नाही काढला??- निलेश राणे

मुंबई |  शिवसेनेने आज शेतकऱ्यांच्या पीकविमा प्रश्नांसाठी इशारा मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चावर राज्यातील सगळ्या विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शिवसेनेला मोर्चाच काढायचा होता तर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ वंगल्यावर का नाही काढला??, असा सवाल करत शिवसेनेच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

शिवसेना एवढी लुख्खी झालीये की विमा कंपन्या त्यांचं ऐकत नाही म्हणून त्यांना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढावा लागतोय, असा निशाणा निलेश यांनी शिवसेनेवर साधला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर बसून खरं तर शिवसेनेनं हा विषय सोडवायला पाहिजे होता पण निवडणुकीच्या तोंडावर सगळं राजकारण, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचा आजचा मोर्चा हा शेतकऱ्यांचा नसून शेतकऱ्यांसाठीचा आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आमच्या रक्तात माणूसकी आहे. आणि आम्ही माणुसकी जपत राहू… शिवसेनेचं हेच तर काम आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आमच्यावर टीका करणार्‍यांनी आधी स्वतःच्या रक्तातील भेसळ बघावी, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना दिलं आहे.

आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या-