देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

नवी दिल्ली | भारताचे माजी राष्ट्रपती आणि माजी केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यासंदर्भात प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना 10 ऑगस्ट या दिवशी लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिवसेंदिवस उपाचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रणव मुखर्जी यांना काही काळ व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. पण त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसली नाही त्यासोबतच प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झालं होतं.

प्रणव मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या कालावधीत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं आहे. राष्ट्रपतीपद भूषवण्याआधी 2009 ते 2012 या काळात मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा होती. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 1969 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांची  राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

अंतिम वर्षाच्या परीक्षा केव्हा आणि कशा पद्धतीने होणार?; राज्य सरकारने केलं जाहीर!

इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर आपलं चंबू गबाळ आवरावं, हा काय तमाशा चाललाय- संजय राऊत

…तर सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण विरोधकांच्या अंगलट येईल- रावसाहेब दानवे

काँग्रेसनंतर आता भाजपमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर!