रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर देण्यात आली ‘ही’ नवी जबाबदारी

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक फायनॅन्स अँड पॉलिसीच्या अध्यक्षपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल हे 22 जून 2020 पासून चार वर्षांसच्या कालावधीसाठी आमच्यासोबत जोडले जात असल्यानं आम्हाला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया एनआयपीएफपीकडून देण्यात आली.

एनआयपीएफपीचे मुख्य उद्दिष्ट सार्वजनिक अर्थशास्त्राशी संबंधित क्षेत्रात धोरण बनवण्यास योगदान देणं हे आहे. या संस्थेला अर्थ मंत्रालय, केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारांकडून वार्षिक अनुदानही मिळतं.

2018 मध्ये डिसेंबर महिन्यात उर्जित पटेल यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसंच रिझर्व्ह बँकेच्या बैठकीपूर्वीच त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

-कोव्हिड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी ससून रुग्णालयाला 12 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर- अजित पवार

-आता ‘या’ देशात अनोळखी माणसासोबत शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत, कारण…

-भावनिक, मानसिक लिंचिंगमुळे सुशांतचा बळी गेला- कंगणा राणावत

-जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं?- राहुल गांधी

-“पंतप्रधानपद सोडा… पुढच्यावेळी शिवसेनेने मुंबईत महापौर तरी बसवून दाखवावा”