“राहुल गांधींचं पाकिट कुणी मारलं?”; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. परिणामी विविध पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे. अशात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

देशाच्या राजकारणात सध्या भाजप आणि काॅंग्रेसमधील सत्तासंघर्ष प्रचंड गाजत आहे. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील वातावरण पेटलं आहे.

पाचपैकी सध्या चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर पंजाब या एकमेव राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे. अशातच भाजपच्या हातातून सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विक्रमी आमदार असले तरी भाजपच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. भाजपमधील आमदार आणि मंत्री सध्या विरोधी पक्षांमध्ये जात आहेत. अशात पंजाबमध्ये वेगळंच राजकारण पेटलं आहे.

काही दिवसांपूर्वी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी काॅंग्रेस नेत्यांसह विधानसभेच्या उमेदवारांना सोबत घेत सुवर्ण मंदिरास भेट दिली होती.

या भेटीनंतर माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी अजब वक्तव्य केलं आहे. सुवर्ण मंदिरात राहुल गांधी यांचं पाकिट कोणी मारलं?, असा सवाल बादल यांनी केल्यानं राजकारण तापलं आहे.

चरणजीत सिंग चन्नी, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा या तीन नेत्यांना राहुल गांधी जवळ जाण्याची परवानगी होती, असंही कौर म्हणाल्या आहेत.

अपवित्र घटनानंतर आमच्या पवित्र मंदिराचे नाव बदनाम करण्याचा आणखी एक प्रयत्न, असा आरोप कौर यांनी काॅंग्रेसवर केला आहे. परिणामी पंजाबमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 जगभरात NeoCoV व्हायरसची दहशत; तज्ज्ञांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती

 ओमिक्रॉनमधून नीट झाल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका

Budget 2022: बजेट म्हणजे नक्की काय असतं? तुम्हाला काय फायदा होतो? वाचा सविस्तर

“लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचं नाही”, अखेर किंग कोहलीने सोडलं मौन

“शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, सोनिया गांधी यांना… “